अनलाॅक ३ मध्ये ठाण्यात माॅल, जिमला परवानगी नाही

ठाणे - राज्यात तब्बल ४ महिन्यांनी माॅल्स सुरू होणार आहेत. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयानंतरही ठाण्यात माॅल सुरु होणार नाहीत. कारण तसे आदेश ठाणे महानगरपालिकेने जारी केलेत.ठाणे महानगरपालिका हद्दीत करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ठाणे महानगरपालिकेने तुर्तास तरी ठाण्यात माॅल जीम, स्विमिंग पुल, मार्केट ( जीवनावश्यक वगळता ) सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे.मॉल सुरू होतील या पार्श्वभूमीवर नुकतेच ठाण्यातील विवियाना माॅलमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या होत्या. यासाठी मॉलमध्ये आलेल्या ग्राहकांमध्ये सोशल डिस्टसिंग रहावे, गर्दी होवू नये, पी १ - पी २ चा नियमाचे पालन, येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचे तापमान मोजणे, ॲाक्सिजन पातळी तपासणे याशिवाय प्राथमिक उपचार यासर्वची सोय करण्यात आली होती. त्याप्रमाणे ठाण्यात इतर माॅलमध्येही ही उपाययोजना लागू करण्यात आली होती. मात्र, आता ठाणे महापालिकेने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मॉल सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget