चौकशीसाठी आलेल्या बिहार पोलिसांना मुंबई महापालिकेने केले क्वारंटाईन

मुंबई - अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात करण्यासाठी पाटणा पोलिसांनी आयपीएस विनय तिवारी यांच्या नेतृत्वाखाली चार पोलीस अधिकारी मुंबईत पाठविले आहेत. मात्र मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांना मुंबई महापालिका प्रशासनाने बळजबरीने क्वारंटाईन केले असल्याचा आरोप बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी केला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, की पाटण्याचे सिनियर सुपरिडेंट ऑफ पोलीस विनय तिवारी यांच्या नेतृत्वाखाली चार पोलीस अधिकारी रविवारी मुंबईत ११ वाजता दाखल झाले. त्या नंतर त्यांना मुंबई महापालिका प्रशासनाने बळजबरीने क्वारंटाईन केले आहे. त्यांना आयपीएस मेसमधील राहण्याची व्यवस्थाही नाकारण्यात आली आहे.सुशांतसिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाटणातील राजीव नगर पोलीस ठाण्यात रिया चक्रवर्ती हिच्याविरूद्ध एफआयआर दाखल केली होती.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget