मुंबई महापालिका दलालांमार्फत रुग्णालयांचे पैसे उकळत आहे - प्रवीण दरेकर

मुंबई - महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई महानगरपालिकेवर दलालांमार्फत कोविड रुग्णालयांचे पैसे उकळल्याचा गंभीर आरोप केला. यावेळी त्यांनी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या विषयावरुन शिवसेनेवर टीका केली. प्रवीण दरेकर यांनी 8 ऑगस्ट रोजी मुलुंड पश्चिम आयबीएस रोड येथील जम्बो कोविड रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.प्रवीण दरेकर म्हणाले, जम्बो कोविड सेंटरचे ७ जुलैला उद्घाटन झाले, परंतु अजून देखील येथे आयसीयू कक्ष नाहीत. एजन्सीमार्फत लूटमार सुरु आहे. या एजन्सीने १० पट पैसे आकारण्याचे काम केले आहे. यात मुंबई महापालिकेचाही समावेश आहे.१०० बेड असतील, तर ४०० बेडची बिले लावली जात आहेत. मुंबई महापालिका दलालांमार्फत कोविड रुग्णालयांचे पैसे उकळत आहे. भाजप याचा पर्दाफाश करणार आहे. मुंबईकरांचे अवाजवी पैसे जाणार नाहीत. डॉक्टर आणि नर्सेसचे देखील अनेक प्रश्न आहेत.
वराती मागून घोडे नाचवण्यात काही अर्थ नाही. ९० टक्के कोकणवासीय हे अर्धे कोकणात पोहचले आहेत. अजूनपर्यंत बसेसची बुकिंग नाही. ते १४ दिवस क्वारंटाईनचा त्रास भोगत आहे. शिवसेनेसाठी मुंबईच्या चाकरमान्यांचे योगदान मोठे होते. त्याच चाकरमान्यांना शिवसेनेचे नेते विनायक राऊत येऊ नका म्हणून सांगतात. शिवसेनेला कोकणवासीयांचा काहीही पुळका नाही. मी दौरा केल्यानंतर राज्यपालांनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे ही मदत झाली आहे, असेही प्रवीण दरेकर म्हणाले.प्रवीण दरेकरांनी यावेळी कोकणवासीयांसाठी सिंधुदुर्गात सव्वा कोटी रुपयांचे एक मोठे कोरोना चाचणी केंद्र उभं करणार असल्याची घोषणा केली.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget