सीबीआय करणार सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास

नवी दिल्ली - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे. बिहार सरकारने केंद्र सरकारला केलेल्या विनंतीनंतर, या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. या तपास कामासाठी सीबीआय सज्ज असल्याची माहिती बुधवारी सीबीआय कार्यालयाकडून देण्यात आली.
केंद्रीय तपास यंत्रणा आता या बहुचर्चित आत्महत्या प्रकरणी बिहार पोलिसांनी दाखल केलेला एफआयआरची पुन्हा एकदा नोंद करण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये सुशांततसिंह यांच्या कुटुंबीयांनी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त, फसवणूक, कट रचणे यासह इतर आरोपाखाली तक्रार दाखल करण्यात आली आहे.कायदेशीर प्रक्रियेनुसार सीबीआयला या प्रकरणातील संदर्भ पुन्हा एकदा पडताळणी करून पाहण्याचे स्वातंत्र्य आहे, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार हे पडकरणी आता थेट तपासासाठी घेतले जाणार आहे.सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहार पोलिसांच्या चौकशीला मुंबई पोलिसांनी विरोध केल्याच्या आरोपासह महाराष्ट्र सरकारचा तीव्र विरोध होत असतानाच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणाची सीबीआयमार्फत तपासणी करण्याची विनंती केली होती.मुंबई पोलीस आणि सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत छप्पन जणांचे जबाब नोंदवले आहेत, यामध्ये सुशांतच्या बहिणीसह रिया चक्रवर्ती आणि बॉलीवूडच्या काही दिग्गज व्यक्तींचाही समावेश आहे. याप्रकरणी बॉलिवुडचे दिग्दर्शक आदित्य चोप्रा आणि संजय लीला भन्साली यांच्याही साक्षी नोंदविण्यात आल्या आहेत
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget