ईडीकडून रिया चक्रवर्तीच्या भावाची१८ तास चौकशी

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती मुख्य आरोपीच्या जाळ्यात अडकल्याचे दृष्य समोर येत आहे. या प्रकरणी ईडीने रियाची तब्बल ८ तास चौकशी केली. त्यानंतर तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ईडीकडून शोविकची देखील चौकशी करण्यात आली आहे. शनिवारी रात्री ईडी कडून चौकशी करण्यात ही चौकशी जवळपास १८ तास सुरू होती.१८ तासांच्या चौकशीनंतर शोविक ईडी कार्यालयाच्या बाहेर आला. शनिवारी रात्री ११ च्यासुमारास ईडीकडून त्याची चौकशी सुरू होती. यावेळी मनी लांड्रिंग संबंधित शोविकची चौकशी सुरू होती. शोविक नंतर रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांची देखील ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. 
चक्रवर्ती कुटुंबीयांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर याप्रकरणातील मुख्य धागेदोरे समोर येतील. दरम्यान सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील ईडीचा तपास तीव्र झाला आहे. रियावर सुशांतच्या खात्यातून १५ कोटी काढून घेतल्याचा आरोप आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर हे आरोप केले आहेत.सुशांतच्या प्रकरणात चौकशी सुरू आहे. तत्पूर्वी, मुंबई पोलिसांच्या तपासादरम्यान ईडीने तपास सुरू केला होता. रिया आणि तिचा भाऊ यांच्यामार्फत सुशांतसिंह राजपूतच्या बँक खात्यातून पैशांचा व्यवहार झाल्याचा ईडीचा संशय आहे.रियाची खार (शिवालिक बिल्डर्स), मुंबई येथे एक मालमत्ता आहे. जी ८५ लाखात खरेदी केली गेली. या मालमत्तेसाठी २५ लाखांचे डाउन पेमेंट केले गेले. त्याचवेळी ६० लाखांचे गृह कर्ज घेण्यात आले. ५५० चौरस फूट फ्लॅट रियाच्या नावावर बुक झाला होता. दुसरी मालमत्ता रियाच्या वडिलांच्या नावाची आहे, ती २०१२ मध्ये ६० लाख रुपयांमध्ये खरेदी केली गेली होती. २०१६ मध्ये या मालमत्तेचे पजेशन पॅराडाइझ ग्रुप बिल्डरने दिले होते. ही मालमत्ता ११३० चौरस फूट आहे. जी उल्वे येथे आहे.




Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget