पनवेलमधील दुकाने उघडली

पनवेल - राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर पनवेल महापालिकेनेही सरसकट दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला. महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शुक्रवारी विशेष आदेश काढून याची घोषणा केल्यामुळे पनवेलमधील दुकानचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी लॉकडाऊनमध्ये वाहनांच्या समविषम पार्किंगप्रमाणे दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सुरू असल्यास समोरील बाजूची दुकाने बंद असायची. या धोरणामुळे रस्त्यावर नागरिकांची गर्दी कमी होती मात्र दुकानदारांवर अशी बंधने न ठेवता सर्व दुकाने सुरू करावी, अशी मागणी व्यापारी संघटना करीत होत्या. बहुजन वंचित आघाडीने १२ ऑगस्टला आंदोलन करून तर स्थानिक व्यापारी संघटनांनी महापालिकेकडे पत्र, निवेदने देत दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. पनवेल शहरातील कोविड १९ची परिस्थिती काही अंशी नियंत्रणात येत असल्याचे मान्य करत दुकानांना सकाळी ९ ते रात्री ७ वाजेपर्यंत परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश शुक्रवारी काढण्यात आले. मात्र मॉल, मार्केट, जीम आणि स्वीमिंग पूलला मात्र परवानगी दिली जात असल्याचे त्यामध्ये नमूद केले आहे. पाच महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर दुकाने सरसकट सुरू ठेवण्यास परवानगी मिळाल्यामुळे दुकानचालकांनी आनंद व्यक्त केला आहे. १५ ऑगस्टपासून परवानगी असताना अनेक दुकानचालकांनी १४ ऑगस्टपासून दुकाने सुरू केली.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांची भेट घेऊन दुकाने सरसकट सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. देशमुख यांनी ठाकूर यांना पुणे महापालिकेने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे पनवेलमध्येही दुकानांना परवानगी देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा प्रशांत ठाकूर यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या पत्रकात केला आहे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget