चंद्रकांत पाटील यांची गुजरात भाजप अध्यक्षपदी निवड

नवसारी - भारतीय जनता पार्टीने गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार चंद्रकांत रघुनाथ पाटील अर्थात सीआर पाटील यांची निवड केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय समजले जाणारे, सीआर पाटील हे गुजरातमधील नवसारी येथील खासदार आहेत.
या अगोदर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी जीतूभाई वाघाणी यांच्यकडे होती. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता सीआर पाटील यांची पक्षाने या पदासाठी निवड केली आहे. गुजरातमधील आगामी पोटनिवडणुका, जिल्हा व तालुका पातळीवरील निवडणुकांसह विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.एक टेक्नोसॅव्ही नेता म्हणूनही सीआर पाटील यांच्याकडे पाहिले जाते. सोशल मीडियाचा वापर करून ते कायम आपला जनसंपर्क वाढवत असतात. त्यांचे जन्मगाव महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पिंपरी आक्राउट आहे. १९६० मध्ये भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर पाटील यांचे कुटुंब गुजरातमध्ये स्थलांतरित झाले.यानंतर त्यांचे संपूर्ण शिक्षण गुजरातमध्येच झाले. १९८९ मध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत सीआर पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. सूरतचे भाजपाचे खजिनदार म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget