वर्ष सरत गेली जबाबदाऱ्या वाढतच गेल्या...

मुंबईतील एक सामान्य मराठी कुटुंबातील महिलेची गाथा, माझा जन्म मुंबईत झाला तशी आमच्या घराची परिस्थिती बिकटच त्यातून आम्ही पाच भाऊ बहीण, वडील पालिकेत सेक्युरिटीची नोकरी करत घर चालवत असायचे.त्यातून पाच भावंडातून मी तिसऱ्या नंबरची तशी मी लहान लहानपणासूनच खोडकर मला मुलांसारख्या गोट्या खेळायला भरपूर आवडायच्या परंतु,घरी आईला माझा राग यायचा त्यामुळे कित्येक वेळा मी माँर खायची पण खेळायचे सोडले नाही. घराची परिस्थिती बिकट होती.आई आमच्यासाठी दूध आणत आणत तिने दुधाचा धंदा चालू केला आणि बघता बघता एक हजार लिटर दूध आम्ही विकायला लागलो.मग त्यातूनच आई घराचा खर्च काढायची. वर्ष सरत गेली आणि आम्ही मोठे होत गेलो वडिलांचा पगार काय आमच्या घरच्यांना पुरायचा नाही. त्यातच वडिलांना दारू पिण्याची सवय पगार झाला कि,अगोदर दारूवाल्याचे बिल पूर्ण करायचे त्यानंतर उरलेला पैसे घरात यायचा त्यामध्ये घरचा खर्च निघणार कसा ? मराठी माणसांना एकवेळ जेवण नसेल तर चालेल पण दारू पहिली पाहिजे त्या काळात मराठी माणसांची हीच सवय त्यांना भारी पडली. आमच्या घरी कसेबसे दोन वेळेचे जेवण मिळत होत होते तेच आमचे नशीब म्हणायचे. तशी मी लहान असतानापासूनच म्हणजे शाळेत जाऊन आल्यानंतर सर्वांच्या घरी दूध पोचवायची नंतर घरी येऊन आईला हातभार लावायची बघता बघता बहीण १६ वर्षाची झाली त्यामुळे आता तिचे लग्न करण्याचा विचार आईने केला आणि तिच्यासाठी स्थळ बघायला सुरु केले. एक चांगले स्थळ मिळाले आणि तिचे लग्न उरकून टाकले. बहीण गेल्यावर घरातील सर्व कामाची जबाबदारी माझ्यावर पडली.घरात खानावळ सुरु केले होते त्यामुळे त्याजेवणाला आईला हातभार लावणे नंतर भांडी धुणे आणि दूध वाटप करणे यातच माझा दिवस निघून जायचा त्यामुळे अभ्यासाकडे कधी लक्षच दिले आणि आणि तसे घरच्यांनीही आठवण करून दिली नाही त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले आणि आईच्या कामात हातभार लावण्यास मग्न झाले. वर्षे सरत गेली आणि नंतर वडिलांना त्यांची चूक माहित पडली पण काय फायदा गेलेलं बालपण पुन्हा तर येऊ शकत नाही ना? जाऊद्यात जे झाले ते बरे झाले असेच मी समजून कामात मग्न राहत असे. त्यातच आता वडिलांना लखवा मारला आणि वरील जागेवरच बसले.आम्ही कित्येक डॉक्टरांना त्यांना दाखवले परंतु इलाज झाला नाही.आता त्यांच्या जागी भाऊ कामाला लागला त्यानंतर कशी बशी परिस्थीती सुधारू लागली. वर्ष सरत गेली आणि मी कधी १७ वर्षाची झाली मलाच माहित नाही. आता आईने माझ्या लग्नासाठी स्थळ बघितले आणि माझे लग्नही उरकून टाकले आणि आई तिच्या जबाबदारीतून मोकळी झाली. त्यातच माझ्या वडिलांनी प्राण सोडला कदचित माझ्या लग्नाचीच वाट बघत असावे. असो, आता लग्न झाले मला वाटले आता काय सुखच सुख परंतु, माझ्या नशिबी सुख काही लिहले नव्हते. आता नवऱ्याच्या घराची जबाबदारी ह्यांच्यावरच होती आणि ते तर सात भावंडं चार बहिणी आणि तीन भाऊ त्यातल्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले तर मोठा भाऊ दारुड्या त्याला तीन मुले त्याची जबाबदारीपण माझ्या नवऱ्यावरच होती. सासू सासरे शेती करत तर हे नोकरी करायचे आता घरी कमावणारा एक आणि खाणारी बारा अशी परिस्थिती होती. मग आम्ही विचार केला आता मुंबई गाठायची आणि आम्ही मुंबईला आलो अगोदर मुंबईला भाड्याने घर घेतले ते कामाला लागले आणि मी खानावळ सुरु केली. तशी मला अगोदरपासूनच सवय होती म्हणा. वर्षे सरत गेली आणि मला पुत्ररत्न लाभला आता अजून एक जबादारी वाढली होती.परंतु,न खचता मी कामावर जोर दिला आणि बघता बघत माझं स्वतःच घर घेतलं.घर घेण्यासाठी थोडं कर्ज घ्यावे लागले.ते कर्ज मी फेडतेच तोवर माझ्या नंदेचे लग्न डोक्यावर आले.तिचे लग्न उरकून दिले त्यानंतर आणखीन दोन नंदांचे लग्न मीच उरकून दिले,वर्ष सरत गेले आणि मला मुलगी झाली आता आम्ही 'हम दो हमारे दो' असा परिवार होता. मुलगा शाळेत जाऊ लागला आणि मुलगी लहान होती ती माझ्या कुशीतच बसायची तिला घेऊन मी खानावळीचे काम करायची.त्यातच आता माझ्या सासऱ्यांचे निधन झाले. मग तिकडेपण मलाच धावावे लागले. वर्ष सरत गेली तसेच मुले मोठी होत गेली. मुलांचं बालपण बिकट परिस्थितीत गेलं त्यांना जे पाहिजे ते देऊ शकली नाही.मी माझ्या मनाला कोसत असे, वर्ष सरत गेली मुले मोठी होत होती तस तसे खर्च वाढत होते जबाबदाऱ्याही वाढतच गेल्या. संकट काय माझा पाठलाग सोडायला मागत नव्हता.त्यातच माझ्या नवऱ्याची नोकरी गेली मग ते पण घरीच मग सर्वच जबाबदारी माझ्यावर घरापासून ते सासुरवाडीपर्यंत मलाच करायचं आहे. हाच विचार करून मी पदर खोंचून घराबाहेर पडली आणि वेगवेगळी कामे करायला सुरुवात केली.म्हणजे धुणीभांडी,पोळीभाजी,रेशन कार्ड,वैगेरे यात मला कित्येक अनुखव आले ते सांगू शकत नाही.त्यातूनही वेळ काढून आता समाजसेवा करायला लागली.काम करत करत गावाचे घर बांधले. वर्ष सरत गेली आणि मुले मोठी झाली. मुलाचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आता तो नोकरीला आहे मुलीगी १२ वी झाली आणि मी राजकारणात आहे. पण मला हे कळले नाही वर्ष सरत गेली 'ती' आणि 'मी' यांच्यामध्ये काही फरक पडला आहे का? मुलांची लग्न करायची आहेत.नंतर जबाबदाऱ्या संपतील का? वर्ष सरत आहे पण जबाबदाऱ्या कधीच संपत नाहीत.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget