‘नया श्रीनगर’ ‘नया जम्मू’ प्रकल्पाची मोदींकडून घोषणा होण्याची शक्यता

श्रीनगर - जम्मू व काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या एका वर्षांनंतरही या ठिकाणी वास्तविक विकास नजरेला पडत नसल्याची टीका होत असताना, ‘नया श्रीनगर’ आणि ‘नया जम्मू’ या हायटेक आणि पर्यावरणपूरक शहरांसह महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करण्याची शक्यता आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पांच्या अंतिम आराखडय़ावर केंद्रीय नगरविकास मंत्रालय आणि जम्मू- काश्मीर प्रशासन हे संयुक्तपणे काम करत असून, पंतप्रधान वैयक्तिकरीत्या त्यावर देखरेख करत आहेत. खोऱ्यासाठी आखण्यात आलेल्या योजनेत दल सरोवराचे जुने वैभव पुनस्र्थापित करण्याच्या प्रकल्पाचा समावेश आहे. या सरोवराभोवती दाट वस्ती असल्याने गेल्या काही वर्षांत त्याचे सौंदर्य कमी झाले आहे. याशिवाय, त्याभोवती अतिक्रमणे आहेत. त्यामुळे सरोवराभोवतालच्या भागातील भार कमी करण्याचा योजनेत समावेश असेल, असे एका सूत्राने सांगितले.
श्रीनगरची संस्कृती, शिल्पकला आणि सौंदर्यदृष्टी यांच्याबाबत संवेदनशीलता बाळगून नव्या शहराची उभारणी व्हावी याबाबत पंतप्रधान आग्रही आहेत. मात्र याचवेळी, हे टिकाऊ असे हायटेक शहर असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.दल सरोवर ४० टक्के आक्रसले असून, पाण्याचा दर्जाही खालावला आहे असे ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला आढळल्यानंतर जम्मू- काश्मीर प्रशासनाने दाल सरोवराला पर्यावरण-संवेदनशील क्षेत्र जाहीर करण्यासाठी गेल्यावर्षी एक समिती नेमली होती. या समितीने फेब्रुवारीत तिचा अहवाल सादर केला आहे. पंतप्रधान जम्मू शहरासाठीही नव्या प्रकल्पाची घोषणा करण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget