अन्यथा मंत्रालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकेल ; विखेंचा इशारा

नगर - महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व राज्यात कुठेही नाही, मुख्यमंत्री फक्त एकमेकांचे रुसवे फुगवे काढण्यात व्यस्त आहेत. शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही पण मंत्र्यांसाठी गाडय़ा खरेदी करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल उपस्थित करतानाच सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही, तुम्ही जनतेच्या मनातून केव्हाच पडले आहात, आता केवळ बैठकांचा फार्स करू नका. दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करा अन्यथा शेतकऱ्यांचा एल्गार मंत्रालयावर येऊन धडकेल, असा इशारा माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे यांनी दिला.
दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी आ. विखे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शहरातील नगर-मनमाड मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका करून सरकारमधील मंत्रीच दूध दरवाढ करण्यास विरोध करीत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.
नगर-मनमाड रस्त्यावर घोषणाबाजी करून सरकारच्या विरोधात आसूड ओढण्यात आले. दूध उत्पादकांच्या वतीने मागण्यांचे निवेदन आ. विखे यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना दिले. या आंदोलनात गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, भाजयुमोचे अध्यक्ष सचिन तांबे, डॉ राजेंद्र पिपाडा, तालुका दूध संघाचे अध्यक्ष रावसाहेब देशमुख, सभापती बापूसाहेब आहेर सहभागी झाले होते.
दूध अनुदानाच्या या महाघोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचे आ. विखे यांनी आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी राहाता पोलिसांनी माजी मंत्री राधाकृष्ण विखे, अण्णासाहेब म्हस्के, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ यांच्यासह २५ ते ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget