देशातील टॉप फाइव्हमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काम करत नाहीत, असे विरोधकांकडून सातत्याने आरोप होत आहे. मात्र, लोकांनी ठाकरे सरकारच्या कामाचे कौतुक केल्याचे दिसून येत आहे. देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्थान पटकावले आहेत. या यादीत ते पाचव्या क्रमांकावर आहेत. दरम्यान, गेल्या तीन सर्वेक्षणात सलग पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी चौथ्या क्रमांकावर घसरल्या आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सलग तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले आहेत. ‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन २०२०’ सर्वेक्षणात योगी आदित्यनाथ यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. योगी आदित्यनाथ यांना एकूण २४ टक्के मते मिळाली आहेत. गेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेच ही मते सहा टक्क्यांनी वाढली आहेत. उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीवरुन राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत असतानाही योगी योगींच्या कारभारावर लोक समाधानी आहेत, हेच यातून स्पष्ट झाले.सर्वेक्षणानुसार, पहिल्या पाचपैकी मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी चौथ्या क्रमांकावर घसरल्या आहेत. ममता बॅनर्जी यांना नऊ टक्के मते मिळाली आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १५ टक्के मते मिळाले असून ते दुसऱ्या आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी ११ मतांसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 

योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश) २४ टक्के 
अरविंद केजरीवाल (दिल्ली) १५
जगन रेड्डी (आंध्र प्रेदश) ११
ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल) ९
उद्धव ठाकरे (महाराष्ट्र) ७
नितीश कुमार (बिहार) ७
एन पटनायक (ओडिशा) ६
केसीआर (तेलंगणा) ३
अशोक गहलोत (राज) २
बीएस येडियुरप्पा (केए) २
भूपेश बघेल (छत्तीसगढ) २
शिवराज चौहान (मध्य प्रदेश)
विजय रुपाणी (गुजरात) २
एकूण १२,०२१ मुलाखती घेण्यात आल्या. ग्रामीण भागातील ६७ टक्के आणि शहरी भागात ३३ टक्के घेतल्या गेल्या. देशातील ९७ संसदीय मतदारसंघ आणि राज्यांमधील १९४ विधानसभा मतदार संघात हे सर्व्हेक्षण करण्यात आले.तर पहिल्या पाच क्रमांकात बिगर भाजप आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget