सोलापूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय ऑनलाइन परिषद ; देश-विदेशातील शिक्षणतज्ज्ञचा सहभाग

सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ग्रामीण विकास आणि पर्यावरणशास्त्र विभागाकडून ७ ते १० ऑगस्ट या कालावधीत 'कोव्हिड काळामधील वातावरणातील बदल आणि ग्रामीण विकास' या विषयावर आंतरराष्ट्रीय ऑनलाइन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली. यामध्ये श्रीलंका, म्यानमार आणि नोएडा येथील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.शुक्रवार ७ ऑगस्टला सकाळी ११ वाजता श्रीलंका येथील ज्येष्ठ शिक्षणततज्ज्ञ प्रा. डॉ. रोहना पी महालीयानारचची हे कृषी पर्यटन, ग्रामीण विकास आणि कोरोना काळातील हवामान बदल याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. ८ ऑगस्टला सकाळी ११ वाजता म्यानमार येथील डॉ. रवीकुमार सिन्हा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. ९ ऑगस्टला सकाळी ११ वाजता प्रतिभावंत लेखक तथा संगणक तज्ज्ञ डॉ. अच्युत गोडबोले हे अर्थकारणावर मार्गदर्शन करणार आहेत. तर, १० ऑगस्टला सकाळी ११ वाजता नोएडा येथील डॉ. भगवती प्रसाद शर्मा इंडस्ट्री, सोसायटी आणि इकॉनॉमी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करणार असल्याचे संयोजक सामाजिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी सांगितले.या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये देश-विदेशातील विद्यार्थी, अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ सहभागी झाले आहेत. श्रीलंका, बल्गेरिया, बांगलादेश, अल्जेरिया, झांबिया, थायलंड, अफगाणिस्थान, इजिप्त आणि फिलिपाईन्स या नऊ देशांचे प्रतिनिधी या ऑनलाइन वेबिनारमध्ये सहभागी होणार आहेत. याचबरोबर महाराष्ट्रासह जम्मू काश्मीर पासून ते इतर सर्व राज्यातील प्रतिनिधी यात सहभागी होत आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget