फूटपाथवर राहणाऱ्या अस्मा शेखच्या मदतीला शिवसेना धावली

मुंबई - फूटपाथवर राहून दहावीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या अस्मा शेख या विद्यार्थिनीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अडचणींवर मात करून यश मिळवणाऱ्या अस्माच्या मदतीला शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक धावून गेले आहेत. एमएमआरडीएच्या माध्यमातून अस्माला छोटंसे घर मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे,' असे सरनाईक म्हणाले
महाराष्ट्र एसएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाला. राज्यातील ९५ टक्क्यांहून अधिक मुलांनी परीक्षेत यश मिळवले. अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीशी झगडून हे यश मिळवले आहे. मुंबईतील आझाद मैदानाबाहेरच्या फूटपाथवर राहणाऱ्या अस्मा शेखही दहावीची परीक्षा ४० टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करून तिने हे यश मिळवले. पावसाच्या दिवसात प्लास्टिकच्या शेडखाली बसून तिनं अभ्यास केला. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अस्माबद्दल माहिती मिळाल्यानतंर आमदार प्रताप सरनाईक यांनी तिच्याशी संपर्क साधला. तिचे अभिनंदन केले व तिला नोकरी व घर मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे. 'अस्माच्या पुढील शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून फोर्ट परिसरातच तिला पार्ट टाइम जॉब मिळवून देणार आहे,' असे सरनाईक म्हणाले. 'अस्माला स्वत:चे घर नाही. आई-वडील आणि भावाबरोबर ती राहते. खरेतर, मुंबई, ठाणे, व मीरा-भाईंदरमध्ये रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्यांना एमएमआरडीएकडून जशी घरे दिली जातात, त्याच पद्धतीने अस्माला एक छोटंसे घर अस्माला मिळावे असा माझा प्रयत्न राहील,' असे सरनाईक म्हणाले. रस्त्यावर लिंबू सरबत विकणाऱ्या आपल्या वडिलांना फूटपाथवरून स्वत:च्या घरात न्यायचे तिचे स्वप्न आहे. त्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करू,' असा शब्द सरनाईक यांनी दिला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget