कोविड सेंटर असलेल्या हॉटेलला भीषण आग, ७ रुग्णांचा मृत्यू

विजयवाडा -  आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथील हॉटेलला रविवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सकाळी ५ वाजता ही आग लागली होती. आगीमुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० जणांना वाचवण्यात आले आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी या हॉटेलचा वापर करण्यात येत होता. येथे २२ रुग्णांवर उपचार सुरू होते. दरम्यान, प्राथमिक अहवालानुसार आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे दिसून आले आहे.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दल कर्मचाऱ्यांसह हॉटलेमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले असून संपूर्ण इमारत खाली करण्यात आली आहे. बचावकर्मीं आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.दरम्यान, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी आगीच्या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. सबंधित अधिकाऱ्यांना बचाव उपाययोजना कराव्यात आणि जवळच्या रूग्णालयात जखमींना दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget