कांदीवलीत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

मुंबई - 
कांदिवली येथे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दरड कोसळल्याने मीरा,भायंदर रोडहून मुंबईकडे येणारी वाहतूकही ठप्प झाली असून रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईचे जनजीवन ठप्प झाले आहे. डोंगराचा काही भाग एका समोरच कोसळला असून विजेचा खांबही कोसळला आहे. त्यामुळे संपूर्ण मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने मीरारोडहून मुंबईला येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मात्र, मुंबईहून मीरारोडला जाणारा मार्ग सुरु आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहनचालकांना दिलासा मिळाला.
रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने मुंबईकरांना रात्रभर जागून काढावी लागली आहे. 
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे संकल भागात मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे.मुंबईत दादर, कुर्ला, सायन, मुलुंड, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, गोवंडी या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे. हिंदमातामध्ये तर दोन ते तीन फूट पाणी भरल्याने येथील वाहतूक कोंडी झाली आहे.रात्रभर पडलेल्या पावसामुळे मुंबई ठप्प झाली आहे. 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget