साताऱ्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अमोद गडीकर यांची बदली

सातारा - जिल्हा रुग्णालयात आढळलेल्या मृत भ्रूण प्रकरणामुळे टीकेचे धनी झालेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कराड दौऱ्यात याबाबतचे सुतोवाच केले. साताऱ्यात होणाऱ्या आरोपांना कंटाळून त्य‍ांनी स्वत:च विनंती बदलीचा अर्ज शासनाकडे केला होता, असे समजते.गेल्या आठवड्यात जिल्हा रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्याला स्वच्छतागृहात मृत अर्भक सापडले होते. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने गदारोळ उडाला होता. ऑगस्ट २०‍१८ मध्ये साताऱ्याचा शल्य चिकित्सक पदाचा चार्ज घेतलेल्या डॉ. गडीकर यांनी गेल्या दोन वर्षांत मानसोपचार विभागाचे अद्ययावतीकरण, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरची निर्मिती, अद्यावत डीएसआयसी सेंटरची निर्मिती, जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालय इमारतीसाठी हस्तांतरण, दंतचिकित्सा विभागात ६५ लाखांच्या सुविधा, जिल्हा रुग्णालयाच्या प्रत्येक मजल्यावर आरओ प्युरिफायरची सोय, वॉटर एटीएमची सोय, संपूर्ण जिल्हा रुग्णालय सीसीटीव्हीच्या कक्षेत आदी कामे मार्गी लावली. तथापि, त्यांच्या कार्यपद्धतीवरुन गदारोळ सुरू झाला. वारंवार होणाऱ्या तक्रारींना कंटाळून डॉ. गडीकर यांनी काही आठवड्यांपूर्वी विनंती बदली मागितल्याचे सांगण्यात येते. त्यात मृत अर्भक प्रकरण घडले. अखेर डॉ. गडीकर यांना हलवण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget