कुलगाममध्ये दहशतवाद्याच्या गोळीबारात सरपंचाचा मृत्यू

श्रीनगर - काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात एका भाजप सरपंचावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या सरपंचाला रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला आहे. सज्जाद अहमद खांडे असे मृत सरपंचाचे नाव आहे.दहशतवाद्यांनी खांडे यांच्या छातीवर आणि पोटावर गोळ्या झाडल्या. याप्रकरणी पोलीस अज्ञात दहशतवाद्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आरीफ अहमद नावाच्या भाजप नेत्यावरदेखील दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्यापूर्वी अनंतनाग जिल्ह्यातील लाखा भवन लर्कीपुरा येथील सरपंच आणि कश्मीरी पंडीत अजय पंडीत यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. तर बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी भाजप राज्य कार्यकारीणीचे सदस्य वसीम बारी यांची गोळी झाडून हत्या केली होती.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget