वाढीव वीज बिलाविरोधात शेकापची महावितरण कार्यालयावर मोर्चा

नवी मुंबई - नवी मुंबई परिसरात अव्वाच्या सव्वा वाढीव विजबिले येत आहेत. वीज बिले भरूनही वाढीव बिले आल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. यामुळे शेकाप आक्रमक झाली असून, वाढीव बिलाच्या निषेधार्थ महावितरण कार्यालयावर शेकापच्या माध्यमातून धडक मोर्चा काढण्यात आला.
वाढीव वीज बिलांविरोधात राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या उलवे येथील कार्यालयावर शेकापने धडक दिली. महावितरण कंपनीकडून ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांबाबत शेकापने कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. ग्राहकांना सुधारित वीज बिले पाठवावी तसेच ग्राहकांचा वीज पुरवठा कोणत्याही प्रकारे खंडित करू नये, अशी मागणी यावेळी शेकापकडून करण्यात आली. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण तसेच ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करणार नसल्याचे आश्वासन महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी शेकापच्या शिष्टमंडळाला यावेळी दिले.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget