सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ६ जणांविरुद्ध एफआयआर

मुंबई - सुशतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडून केला जात आहे. या तपासात सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह सहा जणांविरुद्ध तक्रार दाखल केला आहे. त्यामध्ये श्रुती मोदी हिच्या नावाचा देखील समावेश आहे. आता या प्रकरणात हे नवीनच नाव आल्याने श्रुती मोदी कोण याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे.
श्रुती ही सुशांत आणि रिया या दोघांच्याही अगदी जवळची मैत्रीण म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे श्रुतीचे इन्स्टाग्रामवर अधिकृत नसलेल्या या अकाऊंटला सुशांत आणि रिया हे दोघेही फॉलो करत होते. या अकाऊंटला तब्बल चार हजार फॉलोअर्स आहेत. आता हे अकाऊंट अधिकृत झालेले दिसत आहे.सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाचाही समावेश आहे. सीबीआयने यापूर्वी बिहार पोलिसांनी सुशांतच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून जो गुन्हा दाखल केला होता, त्या आधारावर आता या ६ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांच्या संशयित आरोपींच्या यादीत रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी यांच्यासह एका अज्ञात व्यक्तीचे नाव आहे. कलम १२० बी, ३०६, ३४१, ३४२, ३८०, ४०६, ४२०, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रुती मोदी या महिलेने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीची मॅनेजर म्हणून काम पाहिले आहे. सुशांतच्या कंपनीमध्ये रिया-शोविकचे सर्व काम श्रुती पाहायची. सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी याआधी श्रुतीची चौकशी केली आहे. तसेच श्रुती ही पैशांची पूर्वाश्रमीची बिझनेस पार्टनर असल्याची माहिती समोर येत आहे.सुशांतची आर्थिक परिस्थिती सक्षम होती. तो महिन्याला दहा लाख रुपये खर्च करू शकत होता. त्याच्या बांद्र्यातील फ्लॅटचे महिन्याला साडेचार लाख रुपये भाडे तो देत होता, असेही श्रुतीने मुंबई पोलिसांना सांगितले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget