सडक -२च्या ट्रेलरनंतर महेश भट्ट यांना झटका

मुंबई - सुशांत सिंह राजपूत प्रकरणात चिडलेल्या चाहत्यांनी महेश भट्ट यांचा सडक -२ या चित्रपटाच्या ट्रेलरला नापसंती व्यक्त केली आहे. काहींच्या मते आतापर्यंत केव्हाच कोणत्याही चित्रपटाच्या ट्रेलरला इतके डिस्लाइक्स मिळाले नाही. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड नेपोटिझमवरून वाद सुरू झाला, त्याचा परिणाम महेश भट्ट आणि या चित्रपटातील स्टारकास्ट आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त यांनाही झाला आहे.
ट्रेलरनंतर आता चित्रपटाचे गाणे समोर आल्यानंतरही हिच परिस्थिती आहे. काही वेळापूर्वी सडक - २ या चित्रपटातील 'तूम से ही' हे गाणं समोर आले आहे. हे गाण यूट्यूबवर येताच याला तब्बल १६ हजार डिसलाइक्स मिळाले आहेत. साधारण ७५००० जणांनी हे गाण पाहिल्य असून त्यातील ५.४ हजारांनी हे गाणे लाइक केले असून काही पाहून सोडले आहे तर १६००० जणांनी नापसंती दर्शवली आहे. सोनी मुसिक इंडियाने हे गाणे यूट्यूबवर प्रसिद्ध केले आहे.
स्टार किड्सना लक्ष्य केले जाऊ लागले आणि आता याच स्टार किड्सच्या फिल्म्सनाही नापसंती दर्शवली जात आहे. अभिनेत्री आलिया भट्टच्या आणि अभिनेता संजय दत्त यांच्या सडक २ चित्रपटाचा ट्रेलर सडक २ चा ट्रेलर रिलीज होताच अवघ्या काही तासांतच लाखो प्रेक्षकांनी डिसलाइक केला आहे. युट्युबवर २ चॅनेल्सवर सडक २ चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. फॉक्स स्टार हिंदीच्या युट्यूब पेजवर जवळपास २१ लाख व्ह्युजसह ११ लाख लोकांनी हा ट्रेलर डिसलाइक केला आहे. तर डिज्नी हॉटस्टारच्या पेजवर २४ लाख व्ह्युजसह २ लाखपेक्षा अधिक लोकांनी हा ट्रेलर जिसलाइक केला आहे. ट्विटरवरही असाच ट्रेंड पाहायला मिळाला.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget