कोकणात जाणाऱ्यांसाठी मनसेची विशेष बससेवा

मुंबई - गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मनसेने विशेष बस सेवा सुरु केली आहे. या बस सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. शनिवारपासून या बस सेवेला प्रारंभ झाला असून दादरमधून ही पहिली बस कोकणसाठी रवाना झाली. मनसे आणि महापालिका कामगार-कर्मचारी सेनेच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला आहे.गणेशोत्सवानिमित्त लोकांना कोकणात सोडण्याची जबाबदारी राज्य सरकारची होती. त्यांनी ती योग्य पद्धतीने पार न पाडली नाही त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभम्र होता आणि नाराजी देखील होती. मनसेने हा पुढाकार घेऊन उपक्रम राबवला आहे. शहरातील विविध भागांतून अशा बस कोकणासाठी सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती मनसे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी दिली.
या प्रवासासाठी मनसेच्यावतीने पॅसेंजर सेफ्टी कीट बनवण्यात आले आहे. यामध्ये फेस मास्क, हँड ग्लोव्ह्ज, सॅनिटायझर, बेडशीट यांचा समावेश आहे. सुमारे अडीचशे बसेसपैकी शनिवारी २५ टक्के बसेस दिवसभरात विविध वेळांमध्ये सोडण्यात आल्या.१० ते १५ बसेस दादरवरुन तर काही बसेस या ठाणे, भांडूप आणि इतर भागातून सोडण्यात आल्या. पन्नास प्रवाशांची क्षमता असलेल्या बसमधून निम्म्याच प्रवाशांना जाता येणार आहे. चिपळून, महाडपासून कणकवली-सावंतवाडीपर्यंत या बसेस जाणार आहेत, अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget