तुमचे पितळ एका दिवशी उघडे करणार ! अविनाश जाधव यांचा इशारा

ठाणे - मला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तरीही शेवटी सत्याचा विजय झाला. असे कितीही खोटे गुन्हे दाखल झाले तरी आम्ही त्याला घाबरणार नाही. तुमचं पितळ एका दिवशी उघडं करणार, असा इशारा मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. अविनाश जाधव यांना जामीन मंजूर झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे तळोजा कारागृहाबाहेर स्वागत केले.
ठाण्यातील जे राजकीय नेते मला अडकविण्यासाठी प्रयत्न करत होते त्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला काय संपवायचे आहे ते संपवा. पण अडीशचे मुलींचे कुटुंब उद्ध्वस्त करु नका. तुम्हाला मी खुपसतो. मी जे खरे आहे ते लोकांसमोर मांडतो. तुम्हाला खरे ऐकायचे नसेल तर हरकत नाही, असे अविनाश जाधव म्हणाले.तुम्ही मला अडकवण्याचा जो काही प्रयत्न केला ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितले. तुम्हाला मला संपवायचे असेल तर नक्कीच संपवा. पण अडीचशे मुलींचे नुकसान करु नका, तसे करण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्या कुठल्याही केसेसला घाबरत नाही, असे अविनाश जाधव म्हणाले.
माझ्यावर वसईतही खोटा गुन्हा दाखल झाला. वसईत घडलेला प्रसंग योग्य होता. पण कलम ३५३ नुसार तिथे गुन्हा दाखल होत नव्हता. माज्यावर तिथे ४८ तासांनी ३५३ गुन्हा दाखल केला. जर मी आरोपी वाटत होतो तर पोलिसांनी त्याक्षणालाच मला अटक करायला हवी होती. दोन दिवसांनी कोणाच्या दबावाखाली कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल झाला?, असा सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केला.
ठाण्यात गुन्हाच घडला नाही. ठाण्याबाबत जो व्हिडीओ आज कोटार्ला मी दाखवला त्यात पूर्णपणे स्पष्ट होत आहे की, हा गुन्हा खोटा आहे. खरेतर मला त्यादिवशी ठाण्याच्या नौपाडा पोलीस घेऊन जायला हवे होते. पण खंडणीपथक घेऊन गेले. क्राईम ब्रांच आणि खंडणीपथकाचा यात काय संबंध?, असाही सवाल अविनाश जाधवांनी केला.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget