सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी रवाना ; असा असेल पंतप्रधान मोदींचा अयोध्या दौऱ्यातील कार्यक्रम

नवी दिल्ली - अयोध्येमध्ये आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भव्य राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. राममंदिराच्या भूमि पूजन कार्यक्रमाबाबत पंतप्रधान मोदींचा मिनिट-टू-मिनिट कार्यक्रम जाहीर झाला आहे. मोदी आज सकाळीसकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी दिल्लीहून अयोध्येसाठी प्रवास सुरु केला असून,१०.३५ वाजता विमानाचे लखनऊ विमानतळावर लँडिंग१०:४० वाजता लखनऊ येथून मोदी विशेष हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अयोध्येसाठी प्रस्थान करणार११:३० वाजता हेलिकॉप्टचे अयोध्येतील साकेत कॉलेजच्या हेलीपॅडवर लँडिंग११:४० वाजता हनुमान गढ़ी पोहचून १० मिनिट दर्शन-पूजन१२ वाजता राम जन्मभूमि परिसरात पोहचण्याचा कार्यक्रम१२.१० वाजता रामलला विराजमानचे दर्शन - पूजन१२:१५ वाजता मोदी रामलला परिसरात पारिजातचे वृक्षारोपण करतील१२:३० वाजता मंदिर भूमिपूजन कार्यक्रमास शुभारंभ १२:४० वाजता राम मंदिर कोनशिलेची स्थापना २:०५ वाजता साकेत कॉलेज हेलीपॅडसाठी प्रस्थान २:२० वाजता लखनऊसाठी उडणार हेलीकॉप्टर
अयोध्येत सर्वत्र प्रभू श्रीरामचंद्रांचा जयघोष सुरू आहे. दुर्मीळ आणि ऐतिहासिक सोहळ्यासाठी १७५ मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात १३५ संत-महंत असून, उर्वरित ४० विशेष पाहुणे असतील. सर्वत्र कडेकोट पहारा करण्यात आला आहे. सोहळ्यात यूपीचे राज्यपाल आनंदी बेन पटेल, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत उपस्थित असणार आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget