बिहारमध्ये ६९ लाख लोकांना पुराचा फटका

पाटणा - बिहार राज्यातील पूर परिस्थितीमुळे २१ जणांचा मृत्यू झाला असून, राज्याच्या उत्तरेकडील भागातील ६९ लाख लोकांना पूर परिस्थितीचा फटका बसला आहे.बिहारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार गुरुवारी झालेले दोन मृत्यू हे सिवान जिल्ह्यामध्ये झाले आहेत. राज्यातील एकूण १६ जिल्ह्यांना पुराचा फटका बसत आहे, याचे कारण नेपाळमध्ये उगम झालेल्या आणि भारतात येणाऱ्या नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे.पूर परिस्थितीमुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येमध्ये दरभंगामधील ७, मुजफ्फरपूरमधील ६, पश्चिम चंपारण्यमधील ४, आणि सिवानमधील २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पूरपरिस्थितीचा राज्यातील ६९.०३ लाख लोकांना फटका बसला असून एका दिवसात यामध्ये तीन लाख लोकांची वाढ झाली आहे. ११८५ ग्रामपंचायत क्षेत्रांना पुराचा फटका बसला.खगरिया जिल्ह्यातील तांटी तोला येथे बुधी गंडक नदीवरील तटबंदीला भगदाड पडले. तटबंदीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. जलसंपदा मंत्री संजय कुमार झा यांनी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन ट्विटर वरुन केले आहे. सीतामढी, सुपौल, श्योहर, किशनगंज, पूर्व चंपारण्य, गोपाळगंज, सहरसा, मधेपुरा, मधुबनी आणि समस्तीपूर या जिल्ह्यांना देखील पुराचा फटका बसला आहे.पुराचा फटका बसलेला ४ लाख ८२ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. १२२३९ लोकांना आठवणी निवारा कॅम्प मध्ये ठेवण्यात आले. १४०२ कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दहा लाख लोकांना जेवण पुरवले जात आहे. एनडीआरएफची २० पथके राज्यात पूर परिस्थितीत मदत करण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. त्यासोबतच एसडीआरएफचीपदके देखील तैनात करण्यात आली आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget