पालघर साधू हत्याकांड ; दोन अल्पवयीन आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल

पालघर - पालघर मॉब लिंचिंग प्रकरणाची चौकशी करणार्‍या सीआयडी पोलिसांनी भिवंडी येथील न्यायालयात दोन अल्पवयीन आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. शुक्रवारी बाल न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली.
गेल्या महिन्यात सीआयडीने पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील न्यायालयात दोन आरोपपत्रे दाखल केली होती, त्यापैकी एक ४९५५ पानांचे आणि दुसरे ५९२१ पानांचे होते. या घटनेसंदर्भात एकूण १५४ लोकांना अटक करण्यात आली असून त्यात ११ अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.राज्य सीआयडीच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले की, दोन अल्पवयीन आरोपींविरोधात शुक्रवारी भिवंडी किशोर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. परंतु, अन्य चार आरोपींचे नाव त्या आरोपपत्रात घेण्यात आलेले नाही.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget