गणेशत्सव शांततेत आणि सलोख्यात पार पाडा ; पालकमंत्री सामंतांचा सल्ला

सिंधुदुर्ग - कोकणचा सर्वात मोठा सण गणेशोत्सव सांघिक पद्धतीने साजरा करणासाठी सरपंचाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जिल्ह्यातील सर्व सरपंचानी करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव शांततेत, सलोख्यात व सुरक्षित पद्धतीने साजरा करुन सिंधुदुर्गचा यंदाचा गणेशोत्सव ऐतिहासिक बनवावा, अशी अपेक्षा पालकमंत्री उदय सामंत यानी येथे व्यक्त केल्या.गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नियोजन समितीच्या नवीन सभागृहात सरपंच सघटनेच्या प्रतिनिधींसोबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उदय सामंत बोलत होते. मुंबईतून येणारे चाकरमानी हे आपलेच नातलग असून त्यांच्यात आणि गावातील ग्रामस्थांमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण करण्यात सरपंचाची भूमिका महत्वाची आहे. गणेशत्सव शांततेत आणि सलोख्यात पार पाडण्यासाठी सरपंचाना जिल्हा प्रशासन सर्वेतोपरी सहकार्य करेल, असे सांगून पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, करोना काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने अत्यंत उत्कृष्टपणे काम केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोना बाबतचे काम राज्यातील पहिल्या तीन क्रमांकात गणले जात आहे. ही अत्यंत चांगली बाब आहे.मुंबईवरुन येणाऱ्या चाकरमान्यांना दहा दिवस क्वारंटाइन करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून यंदाचा गणेशोत्सव साजरा करू, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
गणेशत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये चाकरमान्याबरोबरच त्यांची वाहनेही येणार. त्यामुळे रस्त्यावर वर्दळ वाढणार असून जिल्ह्यातील सर्व रस्ते ८ दिवसांच्या आत दुरूस्त करावेत. त्याचबरोबर पावसामुळे कोणत्याही प्रकारे रस्ते बंद राहू नयेत, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना देतानाच पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले की, जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. महामार्गावर बहुतांश ठिकाणी वळण रस्ते आहेत. तिथे वाहन चालकाला दिसतील या प्रमाणे फलक लावले जावेत. उर्वरीत अन्य कामे येत्या आठवडाभरात करण्यात यावीत. या कामाची मी स्वत: पाहणी करणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने प्रलंबित कामे पूर्ण करून घ्यावीत, असेही सामंत म्हणाले.
या बैठकीला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, सुशांत खांडेकर, वंदना खिरमाळे आणि सरपंच संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget