भाजपच्या अनेक मंत्र्यांचा घोडेबाजारात सहभाग - अशोक गहलोत

जयपूर - राजस्थानमधील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. राजस्थानमधील सरकार पाडण्यासाठी सुरु असलेल्या घोडेबाजारात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक मंत्र्यांचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री गहलोत यांनी केला आहे.याआधी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि त्यांच्या गटातील आमदारांनी सचिन पायलट गटावरही जोरदार हल्ला चढवला होता.
अशोक गहलोत म्हणाले, भाजपचा घोडेबाजाराचा खेळ खूप मोठा आहे. त्यांच्या तोंडाला रक्त लागले आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश ते यशस्वी झाल्यामुळेच ते आता राजस्थानमध्ये प्रयोग करत आहेत. देशाचे गृहमंत्रालयच या कामात सहभागी आहे. धर्मेंद्र प्रधान, पियुष गोयल यांच्यासह अनेक मंत्र्यांचा या घोडेबाजारात सहभाग आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान या नात्याने राजस्थानमध्ये सुरु असलेला तमाशा बंद करायला हवा. राजस्थानमध्ये घोडेबाजाराचे दर वाढले आहेत. विधानसभेच्या अधिवेशनाची घोषणा होताच त्यांनी घोडेबाजाराचे दर आणखी वाढवले आहेत, असे अशोक गहलोत म्हणाले.
दरम्यान, राजस्थानमधील राजकीय उलथापालथ आणि घोडेबाजाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे गहलोत गटातील सर्व आमदार शुक्रवारी (३१ जुलै) पुढील १४ दिवसांसाठी जयपूरमधून जैसलमेरला गेले आहेत. राजस्थान विधानसभेचे अधिवेशन १४ ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून काँग्रेसने आपल्या आमदारांना तोपर्यंत जैसलमेरमधील रिसॉर्टमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.हे सर्व आमदार १३ जुलैपासून हॉटेल फेअरमाऊंटमध्ये थांबलेले होते. सचिन पायलट यांच्यासह त्यांचे समर्थक १८ आमदार संपर्काबाहेर गेल्यानंतर काँग्रेसने सर्व आमदारांना या हॉटेलमध्ये ठेवले होते. 
मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी याधीच आमदारांशी बोलताना घोडेबाजार करुन सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असला तरी सरकार सुरक्षित असल्याचा विश्वास दिला आहे. बसपाच्या आमदारांना काँग्रेसमध्ये सामावून घेणे चुकीचे नाही. राज्यसभेत सत्ताधारी भाजपने देखील तेदेपाच्या४ खासदारांना भाजपमध्ये सामील करुन घेतले होते. यावेळी अशोक गहलोत यांनी १४ ऑगस्टला विधानसभेचे अधिवेशन सुरु झाल्यानंतर बहुमत सिद्ध करणार असल्याचेही संकेत दिले आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget