जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने चार नगरसेवक अपात्र

चंद्रपूर - दिलेल्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने गोंडपिपरी नगरपंचायतीचे चार नगरसेवक अपात्र ठरले आहेत. यासबंधीचे आदेश १० ऑगस्टला नुकतेच बदलून गेलेले जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी निर्गमीत केले आहे. अपात्र ठरलेल्या या ४ नगरसेवकांमध्ये माजी नगराध्यक्ष संजय झाडे यांचा देखील समावेश आहे. इतर तीन नगरसेवकांमध्ये जितेंद्र ईटेकर, सरिता पुणेकर आणि किरण नगारे यांचा समावेश आहे.गोंडपिपरी नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक १० जानेवारी २०१६ ला पार पडली. यात हे चारही नगरसेवक राखीव प्रभागातून निवडून आले. यामुळे येत्या एका वर्षात म्हणजेच १० जानेवारी २०१७ पर्यंत त्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. मात्र, माजी नगराध्यक्ष संजय झाडे यांच्यासह इतर ३ नगरसेवकांनी वैधता प्रमाणपत्र उशिरा सादर केले. त्यांनी महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९५६ चे कलम ९ अ व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला. त्यामुळे गोंडपिपरीच्या या चारही नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget