गणेश मूर्तीच्या उंचीवरून कारवाई नको, पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश

सिंधुदुर्ग - गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना प्रशासनाने आपुलकीची वागणूक द्यावी, गणेशमूर्ती दोन फुटांची असावी, असा नियम आहे. पण, कोकणात मोठ्या मूर्तींची परंपरा आहे. या मूर्ती सहा ते सात महिन्यांपूर्वीपासून निश्‍चित केलेल्या असतात. त्याचा विचार करता मूर्तीच्या उंचीवरून कारवाई करू नये, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी दिल्या आहेत.गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने केलेली तयारी आणि कोरोना उपाययोजना संदर्भात नियोजन समितीच्या नवीन सभागृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये पालकमंत्री उदय सामंत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, सुशांत खांडेकर, वंदना खरमाळे, सर्व तहसीलदार, पोलीस ठाण्यांचे प्रमुख व विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यातील तपासणी नाक्‍यांवर होत असलेल्या अँटीजेन तपासणीचा वेग वाढवण्याच्या सूचना पालकमंत्री सामंत यांनी दिल्या. ते म्हणाले, गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची योग्य तपासणी व्हावी. लोकांना ऑक्‍सिजनची लेवल, कोरोनाची लक्षणे यांची सविस्तर माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या लोकांना द्यावी. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.१२ ऑगस्टनंतर येणाऱ्यांना कोविड टेस्ट बंधनकारक आहे. ४८ तासांच्या आत त्यांनी जिल्ह्यात प्रवेश करावयाचा आहे. पण, त्यानंतर त्यांनी किमान ३ दिवस गृह अलगीकरणात रहावे. उत्सवासाठी येणारे चाकरमानी हे सामान्य नागरिक आहेत. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात त्यांचे बरेच हाल झाले आहेत. त्यात प्रवास आणि कोविडचा ताण यामुळे त्यांना बराच त्रास सहन करत प्रवास करावा लागणार आहे. याचा विचार करता येणाऱ्या चाकरमान्यांना कमीत कमी त्रास सहन करावा लागेल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असेही पालकमंत्री सावंत म्हणले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget