पत्री पुलाचे काम रखडल्याने मनसेचा आमदार भडकला

ठाणे - कल्याणमधील पत्री पुलासह इतर अनेक पुलांची कामे प्रमाणाबाहेर रखडल्याने मनसे संतापली आहे. 'सरकारी कामाची कासवगती बघता या पुलांना आता हेरिटेज दर्जाच द्यायला हवा,' असा संतप्त टोला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी लगावला आहे.कल्याण आणि डोंबिवली या शहरांना जोडणारा पत्री पूल सरकारी कामाच्या दिरंगाईमुळं गेल्या काही वर्षांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. ब्रिटिशकालीन असलेला हा पूल मोडकळीस आल्यामुळे पाडण्यात आला होता. मात्र, तब्बल दोन वर्षांनंतरही हा पूल उभा राहू शकलेला नाही. त्याचा प्रचंड ताण या भागातील वाहतुकीवर येत असून रहिवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लॉकडाऊनच्या काळात पुलाच्या कामाला गती मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, तीही फोल ठरली आहे. 
ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार राजू पाटील यांनी प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.पत्री पूल, दुर्गाडी पूल असो वा डोंबिवलीमधील कोपर पूल, माणकोली पूल ह्यांना आता हेरिटेजचा दर्जा देण्याची वेळ आली आहे, असा टोला पाटील यांनी लगावला आहे. 'वर्षानुवर्षे तेच चालू आहे. हैदराबादहून पत्री पुलाचे गर्डर येतात. तारखावर तारखा येतात. पण पुढे काहीच होत नाही. ह्यांच्याकडून लवकर काही शक्य होईल असे मला वाटत नाही. त्यामुळे लोकांनी फार अपेक्षा ठेवू नयेत,' असे पाटील म्हणाले. 
'माणकोली पूल खाडीत अर्धा तरंगताना दिसतोय. बिल कशी काढायची एवढाच यांचा उद्देश दिसतो. अर्धवट काम करायचे. त्याची बिले काढायची. बाकी काही होवो किंवा न होवो. अशा पद्धतीने त्यांचे काम सुरू आहे. कामात कुठलीही सलगता नाही. त्यामुळे यांच्याकडून काही अपेक्षा करण्यात अर्थ नाही. येथील अधिकारी व कंत्राटदारांना दट्ट्या दिल्याशिवाय काम होणार नाही,' असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget