मुंबईला पावसाने झोडपले, पेडर रोड येथे भूस्खलन

मुंबई - बुधवारी पावसाने मुंबईला झोडपले आजही अनेक ठिकाणी पाऊस सुरुच आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले असल्याने मुंबई जलमय झाली आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. बुधवारी मुंबईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना समोर आले आहेत. दरम्यान पेडर रोड येथे भूस्खलन झाले आहे. बुधवारी रात्री पेडर रोड येथे जमीन खचली असून परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. तसंच पेडर रो़डवर पडलेलं झाडही हटवण्याचे काम सुरु आहे.
दोन दिवसात मुंबईत विक्रमी पावसाची नोंद झाली असून गेल्या चार तासात ३०० मिमी पाऊस झाला असल्याची माहिती महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. दरम्यान जे जे रुग्णालयात शिरलेले पाणी पंप लावून बाहेर काढण्यात आले असून रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असल्याची माहिती इकबाल चहल यांनी दिली आहे.
मुंबई, ठाणे परिसरात सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला संततधार पाऊस मंगळवारीही अधूनमधून विश्रांती घेत हजेरी लावत होता. मात्र, बुधवारी पहाटेपासून पावसाने जोर धरला आणि मुंबई, ठाण्यात दाणादाण उडवली. सखल भाग, रस्ते, रेल्वेमार्ग जलमय झाले आणि वाहतुकीचे सर्वच मार्ग पाण्याने रोखले. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे मुंबईत तब्बल १४१ ठिकाणी झाडे कोसळली.तर पाणीगळती रोखण्यासाठी झोपडय़ांवर घातलेले प्लास्टिक उडून गेल्याचे पाहायला मिळाले. पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी ट्रेन आणि गाड्याही अडकल्याचे पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे एनडीआरएफ आणि आरपीएफच्या जवानदेखील बचावकार्यात उतरले होते. दरम्यान, मुंबईतील कुलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यातील गेल्या ४६ वर्षांचा पावसाचा विक्रम मोडल्याचे पाहायला मिळाले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget