नालासोपाऱ्यात महिलेवर सामूहिक बलात्कार

वसई - नालासोपाऱ्यात एका विवाहित महिलेवर घरात शिरून तीन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. नालासोपारा पश्चिम परिसरात राहणारी महिला भाजी विक्रीचा व्यवसाय करते. तर तिचा पती रिक्षाचालक आहे.गुरुवारी रात्रीच्या सुमारास रिक्षा चालक पती रिक्षात सीएनजी भरण्यासाठी मीरा भाईंदर येथे गेला असताना महिला घरात एकटीच असल्याची संधी साधून या तीन नराधमांनी घरात प्रवेश करून आळीपाळीने महिलेवर बलात्कार केला व तेथून पळ काढला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून नालासोपारा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकजण हा पोलिसांचा खबरी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यांना वसई न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा अधिक तपास नालासोपारा पोलिसांकडून करण्यात येत आहे.







Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget