परीक्षेत पास करण्यासाठी प्रोफेसरने केली सेक्सची मागणी

कोलकाता - पश्चिम बंगालमधील युनिव्हर्सिटी ऑफ बर्दवानमध्ये इंग्रजी शिकवणाऱ्या प्रोफेसरवर गंभीर आरोप लावण्यात आलेले आहेत. या प्रोफेसरची एक ऑडिओ क्लीप सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या क्लिपमधील संवादातून त्यांनी केलेले अश्लिल चाळे उघडकीस आले आहेत, ते मुलींचा पाठलाग करतात, ही ऑडिओ क्लीप त्यांच्या पत्नीची आहे. ज्यात ती प्रोफेसरच्या अश्लील वागणुकीबाबत सांगत आहे.
ज्या प्रोफेसरवर हे आरोप लागलेले आहेत ते युनिव्हर्सिटी ऑफ बर्दवानमध्ये इंग्रजी साहित्याचे धडे देतात. या प्रोफेसरच्या पत्नीच्या हवाल्याने दावा केला आहे की, गेल्या २० वर्षापासून ते विद्यार्थिंनाचा पाठलाग करत त्यांचे लैंगिक शोषण करत आहेत. या ऑडिओ क्लीपमध्ये त्यांच्या पत्नींनी मुलींचीही नावे घेतली आहेत. शारिरीक सुखाची मागणी करत त्यांना परीक्षेत मार्क्स देण्याचे लालच देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जी मुलगी प्रोफेसरची मागणी पूर्ण करते तिला परीक्षेत चांगले मार्क्स आणि कंपनीत प्लेसमेंट देण्याची गॅरेंटीही दिली जाते.
ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थी युनियनकडून प्रोफेसरविरोधात कुलगुरुंकडे तक्रार देण्यात आली आहे. यानंतर विद्यापीठाने यावर कायदेशीवर कारवाई करु असे आश्वासन दिले आहे. या तक्रारीत म्हटलें आहे की, अनेक विद्यार्थींनीसोबत प्रोफेसरांचे अफेअर सुरु आहेत. या प्रकारामुळे विद्यापीठाची विश्वासर्हता धोक्यात आली आहे. या ऑडिओ क्लीपबाबत योग्य चौकशी करुन यातील सत्य समोर आणावे असे म्हटले आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget