विनय तिवारी यांची क्वारंटाईनमधून मुक्तता

मुंबई - बिहारमधील पाटण्याचे एसपी विनय तिवार यांचे मुंबई महानगरपालिकेने क्वारंटाईनमधून मुक्त केले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी आलेले विनय तिवारी यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन केले होते. सर्वोच्च न्यायालयाने विनय तिवारीला क्वारंटाईन ठेवण्याबाबत ताशेरे ओढले होते. त्यानंतर आज त्यांची क्वारंटाईन रद्द करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या आदेशानुसार महाराष्ट्रात येण्यापूर्वी राज्य सरकारने दिलेल्या कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन केले नाही, म्हणूनच त्यांना क्वारंटाईन ठेवण्यात आले, असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.विनय तिवारी सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईहून पाटण्याहून रवाना होतील. बीएमसीने विनय तिवारी यांना मेसेजद्वारे क्वारंटाईन समाप्त करत आल्याची माहिती दिली. त्याचबरोबर, बीएमसीनेही या आदेशाची प्रत बिहार पोलिस मुख्यालयात पाठविली आहे. विनय तिवारी यांना फोनवर सांगण्यात आले आहे की, संध्याकाळी ५ ते ५.३० वाजताचे विमान आहे. हे विमान कनेक्टिंग आहे. व्हाया हैदराबाद असून ते पाटण्याला जाणार आहे.
दरम्यान, सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस अधिकारी विनय तिवारी हे विमानाने मुंबईत आले होते. मात्र, विमानाने आंतरराज्य प्रवास करणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्याचा नियम असल्याने मुंबई महापालिकेने त्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन केले होते. यावरुन वादही निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांना सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तपास करण्याची मुभा पालिकेने दिली होती. 
विशेष म्हणजे सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलीस बिहार पोलिसांना सहकार्य करत नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे. त्याच वेळी, बिहार सरकारने केंद्राला या प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. त्यानुसानर केंद्राकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला होता. आता आता सीबीआय चौकशी सुरु होणार आहे. सीबीआयने सुशांतची मैत्रिण रिचा चक्रवर्ती हिच्यासह अन्य जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget