गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भक्तांना १४ दिवसांचे विलगीकरण

रायगड - मुंबई, पुण्यासह जिल्ह्य़ाच्या बाहेरून येणाऱ्या चाकरमान्यांना ७ ऑगस्ट पूर्वी जिल्ह्य़ात दाखल व्हावे लागणार आहे. त्याचबरोबर त्यांना पुढचे १४ दिवस होम विलगीकरणात राहावे लागणार आहे. रायगडच्या् जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी खास गणेशोत्सावासाठी ज्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्यामध्ये याचा समावेश आहे. राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज रायगड जिल्ह्य़ासाठी परिपत्रक जारी केले आहे.
त्यानुसार घरी विलगीकरणाबाबत सूचना करण्यात आल्या आहेत . घरी विलगीकरण आदेशच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही करोना प्रतिबंधक समिती व सरपंच यांची राहील.रायगड जिल्ह्य़ात १५ हजारांच्या आसपास नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. जिल्ह्य़ासह राज्यात करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
याखेरीज गणेशमूर्तीच्या उंचीवरदेखील निर्बंध घालण्याात आले आहेत. घरगुती गणेशमूर्ती ही दोन फुटांची तर सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ४ फुटांपर्यंत उंचीची मूर्ती ठेवता येणार आहे. गणेशोत्सवासाठी कुणी स्वेच्छेने वर्गणी किंवा देणगी दिल्यास स्वीकारता येईल. मात्र घरोघरी जावून वर्गणी मागता येणार नाही. भपकेबाज जाहीराती किंवा पोस्टरबाजी करू नये अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. गणेश मंडपात निर्जतुकीकरणाबरोबरच निर्जंतुकीकरण, तापमान तपासणी व्यवस्था असावी तसेच दिवसातून किमान ३ वेळा मंडपाचे निर्जंतुकीकरण करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget