दहशतवाद्यांकडून भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार

बडगाम - जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात रविवारी दहशतवाद्यांनी एका भाजप कार्यकर्त्याची गोळी मारून हत्या करण्याचा प्रयत्न केला. अब्दुल हमीद नजार असे भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. नजार हे मध्यवर्ती काश्मीरमधील बडगामधील रहिवासी असून रविवारी सकाळी त्यांच्यावर काही दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही माहिती पोलिसांनी दिली आहे.
अब्दुल हमीद नजार हे बडगाम भाजपा इतर मागास प्रवर्गाचे जिल्हाध्यक्ष (ओबीसी) होते. दरम्यान या हल्ल्याबाबत अधिक माहिती हाती आली नसून हा दहशतवादी हल्ला कोणत्या दहशतवादी संघटनेने केला या बाबतही माहिती मिळू शकलेली नाही.गेल्या ६ ऑगस्टला जम्मू काश्मीरमधील कुलगाम येथे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सरपंच सज्जाद अहमद खांडे यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्यात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सज्जाद अहमद खांडे हे आपल्या कुलमामधील वेसू या गावातील घराबाहेर उभे असताना अचानक त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. या आधीही काश्मीर खोऱ्यातल्या विविध भागांमध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची हत्या झाली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget