राज्यसभेचे खासदार अमरसिंग यांचे निधन

नवी दिल्ली - राज्यसभेचे खासदार आणि समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंग यांचे दीर्घ आजाराने शनिवारी निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. सिंगापूरच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या ७ महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. किडनीच्या आजारामुळे ते गेले काही वर्ष ते उपचार घेत होते. २०१३ मध्ये त्यांच्या किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर शस्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र त्यांची प्रकृती चांगली झालीच नाही.
उपचारांसाठी त्यांना नंतर सिंगापूरला हलविण्यात आले होते. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा अखेर झालीच नाही. अनेक वर्ष ते समाजवादी पक्षात महत्त्वाच्या भूमिकेत होते. दीर्घकाळ त्यांनी समाजवादी पक्षाचे महासचिव हे पदही भुषवले होते. त्यावेळी मुलायमसिंग यादव हे अमरसिंग यांच्याच सल्ल्याने कारभार करत असल्याचे म्हटले जात होते.नंतर मात्र त्यांच्यात मतभेद होत गेले. समाजवादी पक्षाचा कारभार अखिलेश सिंग यांच्याकडे आल्यानंतर त्यांच्यातली दरी वाढतच गेली होती. त्यानंतर ते समाजवादी पक्षातून बाहेर पडले. नंतर त्यांनी भाजपशी जवळीक साधली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी आपला पाठिंबा व्यक्त केला होता.बॉलिवूडशीही त्यांचा घनिष्ट संबंध होता. अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींशी त्यांची मैत्री होती. त्यावरून अनेकदा ते अडचणीतही आले होते. बीग बी अमिताभ बच्चन यांच्याशी त्यांची खास मैत्री होती. काही वर्षांपूर्वी त्यांच्यात मतभेद झाले होते. मात्र नंतर त्यांनी ते मतभेद मिटल्याचे जाहीर केले होते.देशातल्या अनेक उद्योगपतींशीही त्यांची मैत्री होती. आपल्या वक्तव्यांमळे ते अनेकदा अडचणीतही आले होते. तसच त्यांनी वादही ओढवून घेतले होते. या मैत्रीचा फायदा त्यांनी समाजवादी पक्षाला करून दिला. अभिनेत्री जया बच्चन आणि जया प्रदा यांना समाजवादी पक्षातर्फे खासदारकी मिळाली होती. अमरसिंग यांच्यामुळेच त्यांना ही उमेदवारी मिळाल्याचे म्हटले जात होते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget