मुंबईतील आणखी एका अभिनेत्रीची आत्महत्या

मुंबई - मुंबई येथील दहिसर परिसरात टीव्ही सिरीयल व भोजपुरी चित्रपटात काम करणाऱ्या अनुपमा पाठक (४०) या अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तिने २ ऑगस्टला राहत्या घरात आत्महत्या केली होती. अनुपमाने सुसाईड नोट लिहिली असल्याचे समोर आले आहे. या सुसाईड नोटमध्ये अनुपमा हिने आत्महत्या करण्यासाठी दोन कारणे सांगितली आहेत. अनुपमाने त्यांच्या मित्राच्या सांगण्यावरून मालाड येथील विस्डम प्रोड्युसर या कंपनीत १० हजार गुंतवले होते, जे २०१९ पासून परत मिळाले नव्हते. याबरोबरच अनुपमाने तिची स्कूटर एका ओळखीच्या व्यक्तीला विकली होती, ज्याचे पैसेही त्यांना परत मिळाले नव्हते.आत्महत्या करण्यापूर्वी अनुपमाने फेसबुक लाइव्ह केले होते. ज्याच्या माध्यमातून त्यांनी म्हटले होते की, जर तुम्ही तुमची एखादी गोष्ट तुमच्या जवळच्या माणसाला सांगत असाल तर ती व्यक्ती तुमच्या कितीही भरवशाची असेल तरी ती तुमच्या भावनांची खिल्ली उडविणारच. यानंतर अनुपमाने आत्महत्या केली. यासंदर्भात पोलिसांनी काशिमीरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget