आत्मनिर्भर भारत अभियान ; १०१ संरक्षण उत्पादनांची आयात रोखली

नवी दिल्ली - केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोठा निर्णय घेत संरक्षण खाते हे आत्मनिर्भर भारत अभियानासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे. १०१ उत्पादनांची यादी तयार करण्यात आली असून या उत्पादनांच्या आयातीला स्थगिती देण्याचा निर्णय राजनाथ सिंह यांनी घेतला आहे. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय आहे असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. भारताच्या संरक्षण खात्याला मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी संधी मिळेल असे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार त्यांनी हा निर्णय घेतला आहे.संरक्षणासाठी लागणारी उत्पादने ही भारतातील असावीत असा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. खासगी आणि पब्लिक सेक्टरशी चर्चा करुन ही यादी तयार करण्यात आली आहे. आत्तापर्यंत २६० योजनांसाठी भारताच्या तिन्ही दलांनी एप्रिल २०१५ ते ऑगस्ट २०२० या कालवाधीत साडेतीन लाख कोटींची कंत्राट दिली होती. मात्र आता हीच कंत्राट देशात मिळाली तर पुढील सहा ते सात वर्षात भारतातील उत्पादकांना ४ लाख कोटींची कंत्राट दिली जातील असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget