कोल्हापुरात पुन्हा 'महापूर'

कोल्हापूर - जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी पंचगंगेच्या पातळीत वाढ सुरूच आहे. गुरुवारी सायंकाळी पंचगंगेने धोका पातळी ओलांडल्यानंतर अवघ्या तासाभरात पंचगंगेची धोका पातळी म्हणजेच पंचगंगा ४३ फुटावर गेली. पंचगंगेची रेडे डोह फुटला की पंचगंगेला महापूर आला असे म्हटले जाते.कोल्हापुरात परंपरागत मच्छिंद्री झाली म्हणजे महापूर आला असे मानले जाते. सलग तीन दिवस सुरू झालेल्या पावसामुळे आज चारच्या सुमारास पंचगंगा नदीच्या पुलावरील कमानीजवळ माशा सारख्या असलेल्या आकारावर पाणी आले आणि कोल्हापुरात महापुराला सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले. मच्छिंद्री होईल, त्यावेळी कोल्हापुरात महापूर आला असे मानले जाते. महापूर आला की, कोल्हापूर शहरातील बापट कॅम्प, शाहूपुरी कुंभारगल्ली, या भागात व चिखली, आंबेवाडी या गावात पुराचे पाणी घुसायला सुरवात होते.
गेल्या दोन दिवसात धरणातील पाणी नदीमध्ये न सोडता ही पंचगंगा नदीची पाणीपातळी तब्बल वीस फुटांली वाढली आहे. त्यामुळे लवकरच कोल्हापूर शहरात पाणी घुसण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात राजाराम बंधारा आहे. या बंधाऱ्यावर नदीपात्रातील पाण्याने ३९ फूट गाठले तर, इशारा पातळी मानली जाते. तसेच ४३ फुटावर पाणी पोहोचले तर धोका पातळी समजून शहरात पाणी येऊ शकते, असे संकेत आहेत. त्यामुळे धोका पातळी झाल्यानंतर स्थलांतराचा वेग वाढविण्यात येतो.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget