मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई - मुंबईत अनेक ठिकाणी पावसाचा जोर दिसून येत आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा जोर दिसून येत आहे. तर दादर, परेल परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. मुंबईत आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गेल्या १२ तासांत शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. अधिक पावसाचा परिणाम पश्चिम उपनगरावर दिसून येईल, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. गेल्या १२ तासांत शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. अधिक पावसाचा परिणाम पश्चिम उपनगरावर दिसून येईल, असे भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने म्हटले आहे. दरम्यान, मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. नवी मुंबई अधूनमधून जोरदार दरी कोसळत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम दिसून येत आहे. रात्रभर पाऊस कोसळत आहे. हीच परिस्थिती रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसून येत आहे. मंगळवार आणि बुधवारी दोन दिवस राज्यातील सात जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड रेड अलर्ट दिला होता. आज दुसऱ्या दिवशीही चांगला पाऊस कोसळत आहे. मुंबई ,पुणे, ठाणे, रायगड ,रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. हा अंदाज पावसाने खरा दाखवून दिला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget