धबधब्याच्या पाण्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

ठाणे - राज्यात पर्यटनबंदी असताना पर्यटक जीव धोक्यात घालून धबधब्यावर भिजण्याचा आनंद घेण्यासाठी जात असल्याचे दिसून येत आहे. अशाच प्रकारे धबधब्यावर जाण्यास बंदी असूनही सहा मित्र सहलीसाठी गेले होते. त्यापैकी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी मुरबाड तालुक्यातील ‘चोंढी’च्या धबधब्यावर घडली आहे.उमेश पांडुरंग बोटकुंडले, (वय, २५) कार्तिक (बबल्या) गडगे (वय,२५), असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. मुरबाड तालुक्यातील मौजे खोपिवली येथील सह्याद्री पर्वत रांगेतून उगम पावलेल्या व पावसाळ्यात पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या 'चोंढी' चा धबधबा पर्यटकांचे आकर्षण आहे. दरवर्षी पावसाळ्यात हजारो पर्यटक गोरखगड ट्रेकिंगसाठी येतात. गोरखगड सर झाल्यानंतर हे पर्यटक समोरच असलेल्या चोंढी धबधब्याचा मनमुराद आंनद लुटतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून पर्यटनस्थळी घडणारे अपघात व अनुचित प्रकार थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आदेश काढून या ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे. तरीही काही पर्यटक हा मनाई आदेश धुडकावून धबधब्यांवर जातात.अशाच प्रकारे गुरुवारी मौजे गडगे, आंबेळे या गावातील ६ तरुण निसर्गाचा आंनंद लुटण्यासाठी खोपिवली येथील चोंढी धबधब्यावर सहलीसाठी गेले होते. धबधब्यात उतरल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुण खोलवर पाण्यात बुडाले, हे पाहून सोबत असलेल्या मित्रांनी खोपिवली गावात येवून सदर घटनेची माहिती दिली. तेव्हा गावकऱ्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, सतत पडणारा पाऊस त्यात पाण्याचा वाढता ओघ पाहता त्यांना, शोध घेणे शक्य झाले नाही.दरम्यान, घटनेची माहिती मुरबाड पोलिसांना देऊन अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यावेळी उमेश याचा मृतदेह हाती लागला, तर कार्तिक उर्फ बबल्या याच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. मुरबाड पोलिसांनी घटनस्थळी पंचनामा करीत उमेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय मुरबाड येथे पाठविण्यात आला आहे. कार्तिकच्या मृतदेहाचा शोध अग्निशमन दलाचे जवान व मुरबाड पोलीस आणि ग्रामस्थ करत आहेत.गुरुवारी रात्रीपासून त्याचा मृततदेह सापडला नसून आता घटनास्थळी. एनडीआरएचे जवान, पोलीस, खोपिवली ग्रामस्थ, आणि मृताचे नातेवाईक शोध घेत आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget