September 2020

नाशिक - महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या मान्य होत नसल्याने भारतीय हितरक्षक सभेच्या वतीने राजीव गांधी भवनासमोर 'जाब विचारा' आंदोलन करण्यात आले. यात अंगणवाडी सेविकांसह भारतीय हितरक्षक सभेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मागील अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविका आपल्या विविध मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. मात्र अद्यापही त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने महानगरपालिकेबाहेर अंगणवाडी सेविकांना सोबत घेत भारतीय हितरक्षक सभेतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

मुंबई - केंद्र सरकारने मित्र पक्षांची पक्षांशी चर्चा न करता संसदेत मंजूर केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात राज्यात काँग्रेस आक्रमक झाले आहे.केंद्र सरकारच्या कृषी धोरणाविरोधात काँग्रेसने राज्यात आंदोलन सुरू केले आहे.काँग्रेसने केंद्राच्या या विधेयकाविरोधात मागील काही दिवसांपासून रस्त्यावर उतरून आपला विरोध दर्शविला आहे. हे विधेयक रद्द करावेत यासाठी मंगळवारी काँग्रेसचे एक शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले.संसदेत हे विधेयक मंजूर करत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेत जोरदार विरोध दर्शवला होता. तर सेनेने मात्र कोणतीही भूमिका घेतली नव्हती. राज्यसभेत हेच विधेयक आल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीसह सेनेच्या खासदारांनीही सभात्याग करून आपला विरोध दर्शवला होता. त्यानंतर राज्यात काँग्रेसने या विधेयकाच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे.

सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, मोदी सरकारने राज्यांना विश्वासात न घेता मंजूर केलेल्या तिन्ही कृषी विधेयकांची महाराष्ट्रात अंमलबजावणी करायची की नाही, यासंदर्भातला निर्णय सर्वांशी चर्चा करुन लवकरच घेतला जाणार आहे. केंद्राला ज्या प्रमाणे कायदे करण्याचा अधिकार आहे, तसाच राज्यांनासुद्धा असल्याचे पाटील यांनी सांगितले.केंद्रातील मोदी सरकारने नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात एकतर्फी विरोधी पक्ष आणि आपल्याही ही मित्रपक्षांना विचारात न घेता कृषी विषयक तीन विधेयके रेटून ते मंजूर करून घेतली. त्यावर देशभरातील शेतकरी संघटनांमध्ये पडसाद उमटले आहेत. देशभरातून अडीचशेहून अधिक शेतकरी संघटनांनी हा काळा कायदा आहे, असे सांगत आपला विरोध सुरू ठेवला आहे. तर काँग्रेसनेही या विरोधात देशभरात मोहीम उघडली आहे.

सहकार मंत्री पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्याला अनेक राज्यांचे तीव्र आक्षेप आहेत. आमचाही विरोध आहे. या विधेयकांवर आमच्या शिर्ष नेत्यांनी भूमिका व्यक्त केली आहे. महाराष्ट्र विकास आघाडी तीन पक्षाचे सरकार आहे. याप्रश्नी सर्वांशी चर्चा करुन भूमिका ठरवली जाईल. मंत्रीमंडळ बैठकीत यावर चर्चा होऊ शकते. त्यानंतर उपसमिती स्थापन होईल आणि ती निर्णय घेईल, असे पाटील यांनी सांगितले.कृषी विधेयकावर आघाडी सरकारची दुटप्पी भूमिका नाही. संबधीत कृषी विधेयके शेतकऱ्यांच्या विरोधी असू नयेत, अशी सरकारची भूमिका आहे राज्यातील आघाडी सरकारमधील काँग्रेसने कृषी विधेयकांविरोधात आंदोलनास प्रारंभ केला आहे. तसेच या विधेयकांसंदर्भात निश्चित भूमिका घेण्याची दोन्ही मित्रपक्षांना आग्रही मागणी केली आहे. मात्र राष्ट्रवादी व शिवसेनेने अद्याप काँग्रेसला प्रतिसाद दिलेला नाही. याप्रश्नी एकमत न झाल्यास सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई - खासदार संभाजीराजे छत्रपती आणि छत्रपती उदयनराजे हे दोन्ही छत्रपती भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत गेले आहेत. आता त्यांनी केंद्राच्या मदतीने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा आणि त्यासाठीच्या आंदोलनाचे नेतृत्वही करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांनी केले. दरम्यान, कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी सर्वाना एकत्रित करणार असल्याचेही पवार यांनी या वेळी सांगितले.

मराठा समाजाच्या आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली आहे. या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या विविध संघटनांकडून आंदोलने सुरू आहेत. या लढय़ात तयार झालेले गट-तट आणि नेतृत्वाच्या मुद्दय़ावरूनही विविध मतमतांतरे होत असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस असलेल्या संभाजीराजे आणि उदयनराजे यांनीच पुढाकार घेण्याची मागणी पुढे येत आहे. हाच धागा पकडत पवार म्हणाले, की या दोघांनीच या लढय़ाचे नेतृत्व करावे. हे दोन्ही छत्रपती भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत गेले आहेत. तेव्हा त्यांनी भाजपाकडून या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोकणातील शिवसेना आमदारांची बैठक झाली. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीत कोकणातील शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात चर्चा झाली. कोरोना संसर्गामुळे गेली सहा महिने मतदारसंघांतील विकासकामांना खिळ बसली होती. त्यामुळे आमदारांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व शिवसेना आमदारांच्या विभागनिहाय बैठका सुरू केल्या आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारपासून शिवसेनेच्या विभागवार आमदारांच्या बैठका घेणे सुरु केले आहे. वर्षा बंगल्यावर पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना आमदारांची बैठक त्यांनी घेतली. या बैठकीत शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांसदर्भात चर्चा करण्यात आली. गेली सहा महिने कोविड १९ चा संसर्ग सुरू असल्यामुळे आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांवर चर्चा झाली नव्हती.  

विदर्भातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने शिवसेनेचे आमदार यांची बैठक वर्षा निवासस्थानी घेतली. मतदारसंघ, जिल्हा व विदर्भातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा केली, अशी माहिती संजय राठोड यांनी दिली. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघातील प्रश्न, निधीची कमतरता यासंदर्भात बैठक झाली. सर्व अडचणी मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेत त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. मतदारसंघातील प्रश्न सोडवून विकासाला गती देण्यासंदर्भातच बैठक झाली,  अशी माहिती  शिवसेना आमदार प्रकाश आबीटकर यांनी दिली.


लखनऊ - उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील अत्याचार पीडित तरुणीची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली होती. मंगळवारी सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर सायंकाळी तिचा मृतदेह आपल्या गावी नेण्यात येणार होता. मात्र, तिचा मृतदेह गावी पोहोचण्यास उशीर झाला. मंगळवारी रात्री गावामध्ये तिचा मृतदेह आणण्यात आल्यानंतर, प्रशासनाने लगोलाग तिच्यावर अंत्यसंस्कारही करुन टाकले. विशेष म्हणजे, तिचे कुटुंबीय आणि गावकरीही अशा प्रकारे रात्री तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यास तयार नव्हते, मात्र गावकऱ्यांचा प्रचंड विरोध असतानाही पोलिसांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

 मंगळवारी रात्री तिचा मृतदेह तिच्या गावामध्ये आणण्यात आला. तिच्या कुटुंबियांचे म्हणणे होते, की अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी सकाळी केला जावा, रात्री नको. मात्र, पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही, आणि रात्रीच तिच्यावर अंत्यसंस्कार करुन टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तिच्या कुटुंबियांनाही अंत्यविधीच्या ठिकाणी येऊ दिले नाही. तसेच, पोलिसांनी मीडियालाही त्याठिकाणी येण्यापासून मज्जाव केला होता.कुटुंबियांच्या परवानगीने अंत्यसंस्कार केल्याचा अतिरिक्त दंडाधिकाऱ्यांचा दावायाबाबत बोलताना अतिरिक्त दंडाधिकारी प्रेम प्रकाश मीणा यांनी कुटुंबियांच्या परवानगीनेच पीडितेवर अंत्यसंस्कार केले असल्याचे म्हटले आहे. मात्र, गावकरी आणि कुटुंबियांच्या मते त्यांना याठिकाणी येण्यासही मनाई करण्यात आली होती. पोलिसांनीच घाई-घाईत चिता रचत पीडितेचा अंत्यविधी केला. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना पोलिसांनी घरात बंद केले होते. 

नवी दिल्ली - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत धक्कादायक खुलासा होत आहे. रिया चक्रवर्ती, दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांच्यानंतरही सलग हे सत्र सुरुच आहे. एनसीबीच्या रडारवर बॉलीवूडच्या ३ मोठ्या स्टार्सची नाव आहेत. एनसीबीच्या रडारवर बॉलीवुडची ३ मोठी नाव आहेत. ही ३ नाव समोर आल्यानंतर एनसीबी त्यांच्याविरोधात पुरावे गोळा करत आहे. पुरावे मिळाल्यास एनसीबी या स्टार्सना देखील समन्स पाठवू शकते. बॉलीवुडचे किंग असल्याचे म्हटले जाते. हे ड्रग्ज सेवन करत असून पुढच्या १५ दिवसात त्यांना समन पाठवले जाऊ शकते. 

ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीच्या चौकशी दरम्यान ड्रग्ज पॅडलर केजे ऊर्फ कमजीतने ५० नाव सांगितली आहेत. जप्त केलेले फोन रिकव्हर करुन एनसीबीला ती नाव मिळवायची आहेत.एनसीबीचे डीजी राकेश अस्थाना स्वत: मुंबईत असून आपल्या दिल्ली आणि मुंबई टीमसोबत महत्वाची बैठक घेणार आहेत. बॉलीवुड ड्रग्ज कनेक्शनसाठी ही बैठक महत्वाची मानली जात आहे.ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत ३५ जणांची चौकशी झाली तर २० जणांना ताब्यात घेण्यात आलंय. पण अजूनही तपास सुरुच आहे. सुत्रांच्या माहितीनुसार एनसीबीने आतापर्यंत कोणाला क्लिनचीट दिली नाही. पुढेही तपास सुरुच राहील. 

मुंबई - कंगनाच्या उद्गारांशी आम्ही असहमत आहोत, पण एका खासदाराने अशी प्रतिक्रिया द्यावी हे शोभते का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारला. कंगना रानौतने केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान राऊत यांच्या वकिलांनी त्यांची बाजू काल मांडली. आम्हीही महाराष्ट्रीय आहोत, आम्हालाही राज्याचा अभिमान आहे पण आम्ही कोणाचे घर तोडायला जात नाही, असे न्यायालयाने राऊत यांना सुनावले.  कायदा काय आहे, उखाड देंगे म्हणजे काय? असा सवाल न्यायालयाने केला. तुम्ही खासदार आहात. तुम्ही कायद्याचा सन्मान राखू शकत नाही का? तुम्ही विचारता कायदा काय आहे, अशा शब्दात न्यायालयाने राऊत यांना खडसावले. 

दरम्यान, कंगनाविरुद्ध घेतलेली भूमिका ही महाराष्ट्राच्या हिताची भूमिका होती, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणाऱ्यांचे दात घशात जातील, असेही राऊत म्हणाले. तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली भेट सामनाच्या मुलाखतीसाठीच होती, असे सांगतानाच लवकरच आपण काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भाजप नेते अमित शाह यांचीही मुलाखत घेणार आहोत, असे राऊत यांनी स्पष्ट केले.


नवी मुंबई - उलवे इथे एकाला खंडणीखोर बोगस पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे. आशिष चौधरी असे आरोपीचे नाव आहे. चौधरी याने पत्रकार असल्याची बतावणी करत डेअरी चालकाकडे दोन हजारांची खंडणी मागितली. खंडणी देण्यास नकार दिला म्हणून चौधरी याने बनावट पिस्तूलातून गोळीबार केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

बनावट पिस्तुलने गोळीबार करुन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या उलवे यु- ट्यूब चॅनलचा पत्रकार आशिष दिनकर चौधरी याला न्हावा-शेवा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याजवळ असलेले मेड इन जर्मनीचे ९ एएम चे बनावट पिस्तुल जप्त केले आहे. त्याने केलेला गोळीबार सीसीटीव्हीमद्ये चित्रित झाला आहे.याप्रकरणी पोलिसांनी आशिष चौधरी याच्यावर खंडणी आणि आर्म कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी (२६ सप्टेंबर) भेट झाली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. यावर राऊत आणि फडणवीस या दोन्ही नेत्यांनी ही राजकीय भेट नसल्याचे स्पष्ट केले होते. तरीही भेटीसंदर्भात विविध चर्चा रंगत आहे. अशात राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, अशी परिस्थिती असल्याचे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

मध्यावधी निवडणूक कुठल्याही पक्षाला नको. आम्हाला पण मध्यावधी नको. पण हे सरकार टिकणार नाही. भाजपने कोणाबरोबर सत्ता स्थापन करावी, अशीही परिस्थिती नाही. पण, आगामी कुठलीही निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार आहे, असेही पाटील म्हणाले. तसेच, राज्यातील कोरोनाची परिस्थिती भयंकर आहे. सरकारचे याकडे लक्ष नाही. त्याचबरोबर, राज्यातील शेतकरीही अडचणीत आहे. रोजगार नसल्याने कामगारांचे हाल होत आहेत. रेल्वे बंद असल्याने लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्यातील समस्यांना सरकारने गंभीरतेने घ्यावे. सरकारने लोकांना मदत करावी, असेही पाटील म्हणाले.

मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत यांच्या कार्यालवर कारवाईबाबत विचारणा करणार्‍या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने कठोर वक्तव्य केले आहे. मुंबई हायकोर्टाने असा प्रश्न उपस्थित केला की एका प्रकरणात पालिकेने चार तारखेला नोटीस दिली आणि८ तारखेला कारवाई झाली. दुसर्‍या प्रकरणात, पालिकेने ५ तारखेला नोटीस दिली आणि १४ रोजी कारवाई करण्यात आली. परंतु कंगना रणौतच्या बाबतीत ८ तारखेला नोटीस देण्यात आली व ९ रोजी कारवाई करण्यात आली. उच्च न्यायालयात सुनावणी सुमारे साडेपाच तास चालली.बृहन्मुंबई महानगर पालिका (बीएमसी) च्या कारवाईविरोधात अभिनेत्री कंगना रनौत यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुनावणीदरम्यान, कंगना रनौत यांच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की, कोरोना कालावधीत मुंबई हायकोर्टाने घाईत कोणतीही कारवाई न करण्यास सांगितले होते, परंतु बीएमसीनेही या प्रकरणात त्या आदेशाचे उल्लंघन केले आहे.त्याच बरोबर, बीएमसीच्या वकीलाचे म्हणणे आहे की उच्च न्यायालयाचा हा आदेश या प्रकरणात लागू होत नाही. कारण हायकोर्टाने पूर्वीच्या प्रकरणांमध्ये पुढील कार्यवाही न करण्यास सांगितले होते, परंतु हे प्रकरण आधीच प्रलंबित नव्हते. दरम्यान, हायकोर्टाने अशी टिप्पणी केली की यापूर्वी न्यायालयही महानगरपालिकेला बऱ्याच प्रकरणात कारवाई करण्यास सांगत होते, पण त्यानंतर बीएमसीने त्वरित कारवाई केली नाही.कंगनाच्या वकिलांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला की, बीएमसी अ‍ॅक्टनेही नियमित करण्याबाबत म्हटले आहे, अशा परिस्थितीत त्यांना नियमित करण्याबाबत अर्ज दाखल करण्यास आणि नियमित करण्याच्या अर्जापर्यंत मुदत देण्यात यावी. तोपर्यंत तोडगा काढल्याशिवाय कारवाई होऊ नये.कंगनाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की कंगनाच्या कार्यालयात कारवाई दरम्यान कोणतेही बांधकाम चालू नव्हते, तर बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याचे सांगत बीएमसीने कारवाई केली.कोणत्याही प्रकारची बेकायदा बांधकाम चालू आहे असे जरी गृहित धरले गेले असले तरी अद्याप नोटीसला उत्तर देण्याची संधी द्यायला हवी होती. पण इथे ती संधी दिली गेली नव्हती असे कंगनाच्या वकिलाने सांगितले.सर्वोच्च न्यायालयापासून उच्च न्यायालयात वेगवेगळ्या निकालांचा हवाला देताना कंगनाच्या वकिलांनी म्हटले आहे की, या निर्णयांनी असेही म्हटले आहे की जर तेथे काही बेकायदा बांधकाम असेल तर त्यामध्ये नोटीस बजावून बेकायदेशीर बांधकाम व्यावसायिकांना नोटीस लावण्याचीही संधी आहे. पण त्या आदेशांचे उल्लंघनही कंगनाच्या प्रकरणात केले गेले आहे. 

वडोदरा - दगुजरात वडोदराच्या बामणपुरा येथे काल रात्री उशिरा बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. अद्याप बचाव कार्य सुरु आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.दुर्घटनाग्रस्ता इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याने बचाव कार्य सुरुच आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही इमारत ३० वर्ष जुनी होती आणि सध्या इमारतीची डागडुजी सुरु होती.मुंबई - शहरात काल रात्री पावणेबाराच्या सुमाराला मुंबईत बॉम्बच्या फोनमुळे यंत्रणांची पळापळ झाली. पण तपासाअंती ही अफवाच असल्याचे उघड झाले. रात्री ११.४० वाजता मंत्रालयाजवळ असलेल्या आमदार निवासात अज्ञात नंबरावरून फोन आला. पुढील ५ मिनिटांत आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे आमदार निवास सुरक्षा व्यवस्था, पोलीस यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. श्वानपथक, बॉम्ब स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाल्या. तातडीने आमदार निवासात राहणाऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. दोन तास सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर रात्री पावणेदोन वाजता हा दिशाभूल करणाऱा कॉल असल्याचे उघड झाले. पोलिसांनी कॉल करणाऱ्या व्यक्तिचा नंबर ट्रेस केला असून, त्याचा शोध सुरू आहे. 

नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. दिल्लीतील इंडिया गेटजवळ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एक ट्रॅक्टर पेटवल्याची घटना घडली आहे.अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी पावणे आठच्या सुमारास त्यांना या आगीची माहिती मिळाली. त्यानंतर आग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्ठळी पाठवण्यात आले. ही आग विझवण्यात यश आली आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, कार्यकर्त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त ईश सिंघल यांनी दिली.दरम्यान, भारतीय जनता पक्षाने या कृषी कायद्यांसंबंधी जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली आहे. याबाबत विरोधक शेतकऱ्यांची आणि देशातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा दावा भाजपने केला आहे. 

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? या चर्चेला उधाण आले आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची भेट याच पार्श्वभूमीवर झाली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दुसरीकडे राऊत आणि फडणवीस यांच्या भेटीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या गाठीभेटींनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व शिवसेना आमदारांना भेटणार आहेत. मात्र या भेटी सामूहिक न घेता जिल्ह्या नुसार होणार आहेत. या भेटीत सरकारच्या कामकाजाबाबत आमदारांची मते काय आहेत. त्यांच्या मतदारसंघतल्या कामाचा वेग कसा आहे याची माहिती ते जाणून घेतील. 

संजय राऊत यांनी भेटीबाबत खुलासा केला असला तरी राज्यात सध्या फडणवीस व राऊत यांच्यातील भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे अद्यापही गुपित आहे. मात्र उद्धव ठाकरे हे सतर्क झाले असून त्यांनी आता त्यांच्या पक्षातील आमदारांना भेटण्याचे ठरवले आहे. जिल्ह्यानुसार आमदाराचे गट मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आमदाराच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी ही भेट असू शकते. 

मुंबई - मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या न्यायालयात आहे. तसेच धनगर, ओबीसी आरक्षणाची मागणी देखील जोर धरत आहे. या पार्श्वभुमीवर राजपूत समाजाने देखील राज्य सरकारकडे आरक्षणाची मागणी केली आहे.सरसकट राजपूताना आरक्षण दयावे अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढू असा इशारा राजपूत महामोर्चा प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी दिला. 

राजपूत समाजातर्फे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान १९ ऑक्टोबरला मोर्चा काढण्यात येईल असे सेंगर यांनी जाहीर केले. मराठ्यांना आरक्षण दयावे किंवा आरक्षण सिस्टीम रद्द करावी या खासदार उदयनराजे भोसले यांच्या  मागणीचे सेंगर यांनी समर्थन केले,तसेच देशासाठी इतिहासामध्ये मराठा आणि राजपूत यांनी प्राणाचे बलिदान दिले. या देशाला गुलामीतुन सोडविले. त्यामुळे मराठांसोबत राजपूतांनासुद्धा आरक्षण देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. किवा प्रत्येक जाती, प्रत्येक धर्मास वेगळे वेगळे कायदे असणारे विषमता प्रधान करणारे सविंधानच बदला असे देखील सेंगर यांनी म्हटले. 


 

मुंबई - नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. या प्रकरणाचा संबंध ड्रग्स कनेक्शनशी असल्यचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची कसून चौकशी सुरू होती आणि ही चौकशी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख राकेश अस्थाना करत होते. पण आता अशी माहिती मिळाली की राकेश अस्थाना पुन्हा दिल्लीला रवाना झाले आहेत.अद्याप कुणालाही क्लीन चिट मिळालेली नाही. 

राकेश अस्थाना जाताना अधिकाऱ्यांना काही सूचना देऊन गेल्याचे कळत आहे.  ज्यात तपासाची दिशा काय असेल याचे निर्देश दिले ,कोणालाही क्लीन चिट दिली नाही, तपास सुरू आहे. पण तपास सुरू असताना राकेश अस्थाना दिल्लीला गेल्यामुळे सगळ्याचे लक्ष तिकडेच केंद्रीत झाले आहे.या प्रकरणाची चौकशी करायला स्वतः राकेश अस्थाना रविवारी मुंबईत आले होते. मात्र आज ते दिल्लीला पुन्हा रवाना झाले आहेत. रविवारी अस्थाना यांनी या संदर्भातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 

नवी दिल्ली - देशातील श्रीमंत उद्योगपतींच्या पंक्तीत बसणारे उद्याेजक अनिल अंबानी यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाल्याचे समोर आले आहे. वकिलाची फी देण्यासाठी पैसे नसल्याने घरातील दागिने विकल्याची माहिती अंबानी यांनी लंडनच्या न्यायालयाला दिली आहे. अनिल अंबानी यांच्याकडून ५२८१ करोड रुपये वसूल करण्यासाठी चिनी बँकांनी अंबानी यांच्याविरोधात खटला भरला आहे. या खटल्यावर लंडनमध्ये सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान अनिल अंबानी यांनी दागिने विकल्याची माहिती न्यायालयाला दिली.

अंबानी यांनी न्यायालयामध्ये म्हटले, की “जानेवारी ते जून २०२० दरम्यान मी ९.९ करोड रुपयांचे दागिने विकले. आता माझ्याकडे कोणतीही मौल्यवान वस्तू नाही.” तसेच आपल्याकडे महागड्या गाड्याही नसल्याचा दावाही त्यांनी केल्याचा सूत्रांनी सांगितले. माझ्याकडे रोल्स रॉयल्स कार नसून, मी साधी कार वापरतो, असेही त्यांनी सांगितले आहे.

अनिल अंबानी यांनी कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबर २०१९ ला त्यांच्या खात्यात ४०.२ लाख रुपये होते. तर १ जानेवारी २०२० ला त्यांच्याकडे फक्त२०.८ लाख रुपये शिल्लक राहिले.

दरम्यान, अंबानी यांनी “माझ्याकडे आता कमाईचे दुसरे कोणतेही साधन नाही. माझी पत्नी आणि तिचे कुटुंबीयच माझा सर्व खर्च उचलतात.” असेही त्यांनी कोर्टाला सांगितले. त्यामुळे धनाढ्य उद्योगपतींच्या पंक्तीत बसणारे अनिल अंबानी यांच्यावर दागिने विकायची वेळ आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अंबानी यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी शक्य तितक्या कायदेशीर मार्गांचा अवलंब करणार असल्याचे चिनी बँकांनी म्हटले. 
बारामती - सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी सरकारविरोधात एल्गार पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण तत्काळ लागू करा, अन्यथा खुर्च्या सोडा, अशी मागणी करत शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानासमोर सकल मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 'ढोल बजाव' आंदोलन केले. 

भिगवण मार्गावरील पीएनजी चौकातून सकल मराठा मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चात मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या वेळी मराठा कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर केला.हातात भगवा झेंडा घेऊन 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देत मराठा आंदोलक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर एकत्र आले. मराठा आरक्षण टिकवा, नाही तर मराठा समाजाचे खासदार, आमदार आणि मंत्र्यांनी राजीनामा द्या. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. मराठा आंदोलकांनी जवळपास एक तास अजित पवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. मात्र. त्यानंतर पोलिसांनी मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले. 

नाशिक  - मराठा आरक्षणासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल, अशी गर्जना संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. सातारा, कोल्हापूर छत्रपती एकत्रच आहेत, अशी ग्वाही यावेळी संभाजीराजे यांनी दिली. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून योग्य समन्वय साधला जात नसल्याची टीका राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी केली आहे.मराठा आरक्षणासाठी लढा अधिक तीव्र करावा लागणार आहे. ही शेवटची लढाई आहे.असे ते म्हणाले. आम्ही दोन्ही छत्रपती एकत्रच आहोत. 

दरम्यान, तीन ऑक्टोबर रोजी पुण्यात विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना निमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहिती शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी साताऱ्यात दिली. 

यावेळी मराठा समाजाच्या प्रश्नांवर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्याबरोबर विनायक मेटे यांनी सविस्तर चर्चा केली. याभेटीनंतर विनायक मेटे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत समाजामध्ये जो संभ्रम निर्माण झाला आहे, तो दूर करण्यासाठी आज ही भेट घेतली. त्यांना मराठा विचारमंथन बैठकीचे निमंत्रण दिले असून ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसेच मराठा समाजाला या बैठकीत दिशा देण्याचे काम त्यांनी करावे, असे आवाहन केले. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी होकार दिला.

यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत सर्वांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव आणून संघटित लढा देण्याचे काम येत्या तीन ऑक्टोबरला पुण्यामधील बैठकीत होणार आहे. या बैठकीला मी स्वतः उपस्थित राहणार असून जो निर्णय समाज घेईल, त्या निर्णयाबरोबर मी असेन, असे शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, मराठा समाजाने कधीही कुणाचे आरक्षण मागितले नसून स्वतः च्या हक्काच्या आरक्षणाची मागणी केली आहे. पुण्यातील बैठकीला मी स्वतः उपस्थित राहणार आहे. नेतृत्व कुणी करावे हे महत्वाचे नाही, तर मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे महत्वाचे आहे. या प्रश्नांची दखल कुणी घेतली नाही तर उद्रेक होईल, याला जवाबदार कोण? असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला आहे.


 

बीड - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी शनिवारी पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. नव्या कार्यकारिणीत मला आजच्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी दिली आहे. या पुढच्या काळात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी निवडीनंतर दिली आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये परळी मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे या नाराज होत्या. आता त्यांना भाजपाने राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी दिली आहे. निवडीनंतर प्रतिक्रिया देताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्या या निवडीमुळे माझ्या कार्यकर्त्यांना देखील आनंद झालेला आहे. कार्यकर्त्यांच्या आनंदातच माझा आनंद असून येणाऱ्या काळात पक्षाने दिलेल्या जबाबदारीनुसार पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.

जालना -   तीन पक्षांचे सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून पडत असेल तर दोष आम्हांला देऊ नये असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राऊत-फडणवीस भेटीवर देखील भाष्य केले. राजकीय नेत्यांच्या भेटी गाठी होत असतात. त्यातून राजकीय अर्थ काढू नये असे दानवे म्हणाले.अशी भेट माझ्यात आणि संजय राऊतांमध्ये देखील झाल्याचे दानवेंनी सांगितले. दिल्लीत मॉर्निंग वॉकला जात असताना भेट झाल्यानंतर संजय राऊत यांनी मला चहाचे निमंत्रण दिले होते. म्हणून त्यांची भेट घ्यायला गेलो होतो. सध्याच्या परिस्थितीत हे सरकार पाडण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही करत नाही मात्र हे तीन पक्षांचे सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून पडत असेल तर दोष भाजपला देऊ नये असेही दानवे म्हणाले.

नवी दिल्ली -  जयप्रकाश नड्डा यांनी शनिवारी नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. त्यात मोदी-शहांच्या विश्वासातील सदस्यांचे स्थान कायम ठेवण्यात आले असले तरी, राम माधव, पी. मुरलीधर राव, अनिल जैन आणि सरोज पांडे यांना महासचिवपदावरून हटवण्यात आले आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अत्यंत विश्वासू भूपेंद्र यादव यांच्यासह अरुण सिंह, कैलास विजयवर्गीय हे तिघे नड्डांच्या चमूतही महासचिवपदी असतील. महासचिवपदी पाच नवे चेहरे दिसतील. त्यात आंध्र प्रदेशमध्ये संघटना मजबूत करण्याच्या हेतूने एन टी रामाराव यांच्या कन्या पुरंदेश्वरी यांचा समावेश आहे.सरोज पांडे यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली आहे. पंजाब डोळ्यासमोर ठेवून तरुण चुग यांना महासचिवपदी बढती देण्यात आली आहे. दुष्यंत गौतम, सी टी रवी आणि दिलीप सैकिया हे दिल्ली, कर्नाटक आणि आसाममधील नेते नवे महासचिव असतील.

शहांचे दुसरे निकटवर्तीय अनिल बलुनी यांना मुख्य प्रवक्तेपदी बढती देण्यात आली असून माध्यम प्रभारीपदी ते कायम राहतील. भाजपच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुखपदाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे अमित मालवीय हेही त्याच पदावर असतील. उत्तर प्रदेशचे राजेश अगरवाल भाजपचे नवे खजिनदार असतील. बी. एल. संतोष यांच्याकडे संघटना महासचिवपदाची जबाबदारी कायम असेल.

भाजपच्या संघटनात्मक फेरबदलात सर्वात मोठा लाभ कर्नाटकमधील तरुण खासदार तेजस्वी सूर्या यांना झाला आहे. त्यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. यापूर्वी ही जबाबदारी खासदार पूनम महाजन यांच्याकडे होती.

बिजू जनता दल, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलातून भाजपमध्ये आलेले अनुक्रमे बैजयंत जय पांडा, मुकुल राय आणि अन्नपूर्ण देवी यांना थेट उपाध्यक्षपदी बसवण्यात आले आहे. पक्षाच्या १२ उपाध्यक्षांमध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, रमण सिंह, रघुबर दास आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे. शहांच्या चमूत उपाध्यक्ष असलेले विनय सहस्रबुद्धे, प्रभात झा आणि ओम माथूर यांना नड्डांच्या चमूत स्थान दिलेले नाही.

पक्षाच्या १३ राष्ट्रीय सचिवांमध्ये विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांची वर्णी लागली आहे. तीन राष्ट्रीय संयुक्त संघटना महासचिवांमध्ये व्ही. सतीश यांचा समावेश करण्यात आला आहे.डॉक्टर लक्ष्मण यांच्याकडे ओबीसी मोर्चा, राजकुमार चाहर यांच्याकडे किसान मोर्चा, लालसिंह आर्य यांच्याकडे एससी मोर्चा, समीर ओरांव यांच्याकडे एसटी मोर्चा आणि जमाल सिद्दिकी यांच्याकडे अल्पसंख्याक मोर्चाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रीय प्रवक्त्यांची संख्या २३ करण्यात आली असून संबित पात्रा, सुधांशू त्रिवेदी, शाहनवाझ हुसेन, गौरव भाटिया, नलिन कोहली, नूपुर शर्मा आदी प्रवक्तेपदी कायम राहिले आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले टॉम वडक्कन यांनाही प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली असून महाराष्ट्रातून संजू वर्मा आणि हीना गावित यांचाही समावेश आहे.

मथुरा - अयोध्या प्रकरणात विजयी झालेल्या रामलल्लानंतर आता मथुरा येथील श्रीकृष्णाने कोर्टात धाव घेतली आहे. मथुरा येथील कोर्टात श्रीकृष्ण जन्मभूमी असलेल्या जागेचा ताबा मिळवण्यासाठी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. श्रीकृष्ण जन्मभूमीच्या १३.३७ एकर जागेची मालकी मिळण्याची आणि शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी केली आहे.

भगवान कृष्ण विराजमान, कटरा केशव देव खेवाट, मथुरा बाजार शहर येथील जागेसाठी याचिकाकर्ती रंजना अग्निहोत्री आणि इतर सहा भाविकांनी ही याचिका दाखल केली आहे. श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागेवर मुघलकाळात कब्जा करण्यात आला होता. नंतर या जागेवर शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली होती. आता याच जागेवरील शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

औरंगजेबाने १६६९-७० मध्ये श्रीकृष्णाच्या जन्माचे श्रीकृष्ण मंदिर कटरा केशवदेव येथे पाडले आणि एक इमारत बांधली गेली. नंतर या इमारतीस ईदगाह मशीद असे संबोधले गेले. १०० वर्षांनंतर मराठ्यांनी गोवर्धनची लढाई जिंकली आणि आग्रा व मथुराच्या संपूर्ण प्रांताचे राज्यकर्ते बनले. नंतर मराठ्यांनी मशिदीची तथाकथित रचना पाडून टाकल्यानंतर कटरा केशवदेव येथे भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान विकसित केले. त्याचे नूतनीकरण केले.

इंग्रजांनी १८०३ मध्ये मथुरा ताब्यात घेतल्यानंतर त्या जागेवर कोणताही बदल करण्यात आला नाही. ब्रिटिशांनी १८१५ मध्ये १३.४७ एकर जागेचा लिलाव करत बनारसच्या राजा पाटणी मल यांना ती जमीन विकली. ते या जमिनीचे मालक झाले, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.

रंजना अग्निहोत्री यांच्यामार्फत दाखल केलेला याचिकेत उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाचे सदस्य, ट्रस्ट मशीद ईदगाह किंवा मुस्लिम समाजातील कोणत्याही सदस्याला कटरा केशव देव यांच्या मालमत्तेत रस किंवा अधिकार नाही, असा दावा करण्यात आला आहे.


श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामधून लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला शनिवारी अटक करण्यात आली. जम्मू-काश्मीर पोलीस, ३२ राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या ९२ बटालियनने संयुक्तपणे ही कामगिरी केली. या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.या दहशतवाद्याचे नाव अकील अहमद पार्रे आहे. तो हंदवाडामधील मंडिगाम क्रालगुंड येथील रहिवासी होता. सुरक्षा दलांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सीआरपीएफ, काश्मीर पोलीस आणि राष्ट्रीय रायफल्सने हंदवाडाच्या या भागात शनिवारी शोधमोहीम राबवली होती. यावेळी शोधपथकाला पाहताच एका व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला.त्याला पकडल्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली. पोलिसांना त्याच्याकडे शस्त्रास्त्रे, काडतूसे आणि स्फोटक पदार्थ आढळून आले. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपण लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचे कबूल केले. यानंतर त्याच्यावर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारला मोठा झटका बसला आहे. कृषी विधेयकांमुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये फूट पडली आहे. शेतकरी प्रश्नावर आणि कृषी विधेयकावरुन भाजपचा घटक पक्ष शिरोमणी अकाली दलाने भाजपाला रामराम ठोकला आहे. भाजप प्रणित एनडीएचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जुना सहकारी शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडला आहे.

कृषी विधेयकावरून शिरोमणी अकाली दल आणि केंद्र सरकारमध्ये ठिणगी पड़ली होती, केंद्र सरकारने कृषी विधेयक , किमान हमी भावासंदर्भातील धोरणावर भूमिका न बदलल्याने शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.नव्या कृषी धोरण जाहीर झाल्यानंतरच अन्नप्रक्रीया मंत्रीपदावरून हरसिम्रत कौर यांनी मागच्याच आठवड्यात राजीनामा दिला होता. आता  शिरोमणी अकाली दल एनडीएतून वेगळे झाले आहेत. अकाली दलने लोकसभा आणि राज्यसभेत या विधेयकांचा विरोध केला होता. भाजप आणि अकाली दल मागील २२ वर्षांपासून सोबत आहेत.


 

नवी दिल्ली - गेल्या सहा वर्षांपासून कोमात असलेले माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे रविवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. २०१४ साली जसवंत सिंह हे त्यांच्या निवासस्थानी पडले होते. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून जसवंत सिंह यांच्यावर दिल्लीतील लष्करी रुग्णालयात उपचार सुरु होते. 

जसवंत सिंह यांच्या निधनाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला. जसवंत सिंह यांनी आधी लष्करात आणि त्यानंतर राजकारणात राहून देशाची परिश्रमपूर्वक सेवा केली. अटलजींच्या काळात त्यांच्याकडे महत्त्वाच्या खात्यांची जबाबादारी होती. त्यांनी अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी सांभाळताना आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांच्या जाण्याने मी दु:खी झालो आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

 संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील ट्विट करून जसवंत सिंह यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी म्हटले की, बौद्धिक क्षमता आणि देशसेवेसाठी जसवंत सिंह हे कायम स्मरणात राहतील. त्यांनी राजस्थानमध्ये भाजप पक्ष मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले.२००९ साली मोहम्मद अली जिना यांची स्तुती केल्यामुळे जसवंत सिंह यांना भाजपमधून बडतर्फ करण्यात आले होते. मात्र, नंतर त्यांना पुन्हा पक्षात सामावून घेतले होते. परंतु, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी जसवंत सिंह यांनी भाजपपासून पुन्हा फारकत घेतली होती. त्यांनी राजस्थानच्या बारमेर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना भाजपच्या कर्नल सोना राम  यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. ठाणे - राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी सत्तेतील घटक पक्ष असलेला काँग्रेस ठाणे शहरात काहीसा नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच पुढील महापालिका निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी काँग्रेसकडून सुरू करण्यात आली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत तसा संदेश पदाधिकाऱ्यांना देऊन प्रभागातील लोकपयोगी कामे आणि नागरी समस्यांचा पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. मुंब्रा येथे झालेल्या या बैठकीमध्ये काँग्रेसचे सर्व नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते.

ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यानंतर या कार्यकारिणीची बैठक मुंब्रा येथे आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी ठाणे शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष मनोज शिंदे, अनिल साळवी, प्रदेश काँग्रेस सदस्य सुखदेव घोलप, जे. बी. यादव, अनिस कुरेशी, महिला काँग्रेस अध्यक्षा शिल्पा सोनोने, युवक काँग्रेस अध्यक्ष आशिष गिरी, एन.एस.यू. आय्. अध्यक्ष आकाश राहाटे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस पक्ष बूथस्तरापासून मजबूत करणे, हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून कार्यकारिणी कार्यरत राहील, असे चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. महापालिका निवडणुकीला अद्याप दोन वर्षे असली तरी नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ असल्याने त्यादृष्टीने कार्यकर्त्यांना दिशादर्शन करण्यात आहे. सरचिटणीस सचिन शिंदे, रवींद्र कोळी यांनी बैठकीचे नियोजन केले.

मीरा रोड - मीरा-भाईंदर महापालिका आयुक्तांनी परिवहन सेवेचा ठेकेदार भागीरथी एमबीएमटीला ठेका रद्द करण्याची नोटीस बजावली असताना आता पालिकेनेच पुन्हा बससेवा ठेकेदाराच्या हवाली केली आहे. पालिकेने स्वत: बससेवा चालवण्याच्या भूमिकेपासून घूमजाव करत ठेकेदाराच्या पदरात लाखो रुपयांची रक्कम टाकली. आयुक्त-ठेकेदाराच्या बैठकीस उपमहापौर, सभागृह नेता आणि नगरसेवक उपस्थित असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.परिवहन सेवा मे. भागीरथी एमबीएमटीला दिली असून पालिकेने ठेकेदारास मोफत बस, अत्याधुनिक डेपो आदी दिले आहे. त्या उपर पालिका ठेकेदारास प्रतिकिमी मागे २६ रुपये अदा करत आहे. कोरोना संक्रमण काळात कर्मचा-यांना ने-आण करण्यासाठी, परराज्यातील नागरिकांना वसई रेल्वे स्थानकात सोडण्यासाठी बस सेवा चालवली जात होती. परंतु ठेकेदाराने पुरवणी करार करून विविध कारणांचे अतिरिक्त पैसे मागितले.

कर्मचाऱ्यांनी पगार मिळावा म्हणून ठेकेदार-पालिकेकडे मागणी केली. भाजपाप्रणित श्रमिक जनरल कामगार संघटनेने अचानक संप केल्याने पालिका व आपत्कालीन सेवेतील कर्मचारी यांचे हाल झाले. त्यावेळीसुद्धा ठेकेदारांसह संपक-यांवर कारवाईची मागणी झाली, पण प्रशासननाने अजून कारवाई केली नाही.

नवी मुंबई - कुठलीही परवानगी नसताना कोरोना रुग्णांवर उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाशीतील तीन नामांकित रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या या काळ्या कारभाराची मनपा प्रशासनाने गंभीर दखल घेत, यातील एका रुग्णालयास १५ दिवस बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण सेवा (OPD & IPD) बंद ठेवण्याचे आदेश दिले, तर उर्वरित दोन रुग्णालयांस एक लाखाचा दंड ठोठावला आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई मनपाने ‘मिशन ब्रेक द चेन’ हाती घेत, ‘ट्रेस, टेस्ट व ट्रिट’ ही त्रिसूत्री राबविण्यावर भर दिला. या अनुषंगाने कोरोना रुग्णांवर लक्षणांनुसार योग्य उपचार व्हावेत याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यामुळे कोव्हिड रुग्णांवर उपचार करताना रुग्णालयांकडून आयसीएमआर (ICMR) तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. पण वाशीमध्ये ग्लोबल हेल्थ केअर कुन्नूरे हॉस्पिटल, क्रिटीकेअर सेंटर आणि पामबीच हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटर या तीन रुग्णालयांत विनापरवानगी उपचार सुरू असल्याची बाब समोर आली.

कोरोना संसर्ग आणि रुग्णांची प्रकृती पाहता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या तीनही रुग्णालयांना नोटिशी बजावल्या होत्या. नोटिशीला वेळेत उत्तर न दिल्याने आयुक्तांनी पामबीच हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटर या रुग्णालयातील बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवा (OPD & IPD) १५ दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले. तर ग्लोबल हेल्थ केअर कुन्नूरे हॉस्पिटल आणि क्रिटी केअर सेंटर या रुग्णालयाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.


रुग्णालयांनी कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्याआधी शासनाची परवानगी घेणे अनिवार्य आहे. तसेच कोव्हिड रुग्णांवर उपचारासाठी आयसीएमआर व महाराष्ट्र शासनाने कार्यप्रणाली निश्चित केलेली असून, त्यानुसारच रुग्णालयांनी उपचार करणे गरचे आहे. साथरोग प्रतिबंधक कायदा-१८९७ ची योग्य अंमलबजावणी करणेही रुग्णालयांस बंधनकारक आहे.मुंबई - मुंबईत मार्च महिन्यापासून लॉकडाऊन आहे. मुंबईतील कोरोनाचा प्रसार आटोक्यात आहे. तरीही नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास मुंबईत फेब्रुवारीपर्यंत पूर्णपणे अनलॉक करता येणे शक्य असल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी म्हटले आहे.

कॉन्फड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांनी 'हेल्थकेअर काँन्फरन्स' आयोजित केली होती. यावेळी 'साथ नियंत्रण आणि त्यामधून बाहेर पडण्याचे मार्ग' या विषयावर पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल बोलत होते. महापालिकेने दुकाने, कार्यालये, मॉल आणि हॉटेल उघडण्यास परवानगी दिली आहे. पुढच्या टप्प्यात धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली जाईल. मात्र शहर पूर्णपणे अनलॉक करायचे असल्यास नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास आणि नियम पाळल्यास फेब्रुवारीपर्यंत पूर्ण शहर अनलॉक करता येऊ शकते, असे चहल म्हणाले.सध्या मुंबईतील पश्चिम उपनगरात कोरोनाचा प्रसार होत आहे. या ठिकाणी मी भेट दिली असता नागरिक मास्क न लावताच रस्त्यावर फिरत असल्याचे निदर्शनास आले. गेल्या ४५ दिवसांत कोरोनाच्या परिस्थितीत बदल दिसत आहे. ८० टक्के रुग्ण झोपडपट्टी विभाग नसलेल्या विभागातून, विशेष इमारातीमधून आढळून येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. पालिकेने रुग्णांसाठी जम्बो कोव्हीड सेंटर उभारली आहेत, त्यात खासगी रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टर टेलिफोन आणि भेटी देऊन उपचार करत असल्याचे आयुक्त म्हणाले.चहल यांना पुरस्कारकोरोना काळात मुंबईतील चांगल्या कामगिरीविषयी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सकडून उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. 

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होण्याची चर्चा आता रंगू लागली आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात गुप्त भेट झाली आहे. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही भेट झाली आहे. सुमारे दोन तास बैठक झाल्याची चर्चा आहे.शिवसेनेकडून भेटीबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केले होते. त्यात त्यांनी एक शेर पोस्ट केला होता. भेटीआधीचे हे सूचक ट्विट होते. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय भूंकपाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या भेटीमागचे अनेक तर्क काढण्यात येत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊनच ही भेट झाली होती, असे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलाखत घेण्याचा संजय राऊत यांचा विचार होता, असेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

संजय राऊत यांनी दैनिक 'सामना'ठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी, अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही, असे स्पष्टीकरण विधानपरिषद विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी दिले आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काहीही घडू शकते, आम्ही कोणतीही गोष्ट नाकारत नाही, अशी सूचक प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली होती. प्रवीण दरेकर यांना विचारले असता, तूर्तास तरी ही भेट ही प्राथमिक स्तरावर होती असे त्यांनी म्हटले आहे. पण आत्ताच या भेटीबाबत काही सांगता येणार नाही, असे प्रवीण दरेकर यांनी आधी स्पष्ट केले. 

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या विरुद्ध कर्नाटकच्या तुमकुर येथील एका न्यायालयात एक फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. कंगनाच्या विरोधात शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप करून खटला दाखल करण्यात आला.कंगना राणौतने कृषि बिलला विरोध करत शेतकऱ्यांचा अपमान करणार ट्विट केले त्यामुळे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे कृषि बिलाबाबत कंगना राणौतने एक ट्विट करत म्हटले आहे की, तिने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. या ट्विटला घेऊन शेतकऱ्यांना विरोध केला आहे. नंतर त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, कंगनाने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे.केंद्र सरकारने कृषि बिलच्या विरोधात शेतकरी संघटनांनी देशभरात प्रदर्शन केली होती. या कृषी विधेयकांच्या विरोधात २५ सप्टेंबर शेतकरी आणि राजकीय संघटनांनी भारत बंद ठेवला होता.

मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता ड्रग्स कनेक्शनचे वळण मिळाले आहे. या प्रकरणामध्ये मोठ्या कलाकारांचे आणि बॉलिवूडमधील इतर लोकांची नावे समोर येत आहे.कोणाकडे ड्रग्स आहेत, कोण कोणला ड्रग्स पुरवतं इत्यादी गोष्टींची सखोल चौकशी एनसीबीकडून करण्यात येत आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील याप्रकरणी अनेक चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान कोणत्याही स्थानिक प्रशासनाच्या आशिर्वादाशिवाय ड्रग्सचा पुरवठा होवू शकत नाही असे ट्विट करत अभिनेत्री रवीना टंडनने संताप व्यक्त केला आहे.

'स्थानिक प्रशासनाच्या आशिर्वादाशिवाय ड्रग्सचा पुरवठा होवू शकत नाही. मात्र याप्रकरणी मोठ्या लोकांची चौकशी होत नाही. सेलिब्रिटींना सॉफ्ट टारगेट केले जात आहे. जर पत्रकार शोध घेत पुरवठा करणाऱ्यांपर्यंत पोहोचू शकतात, तर अधिकारी त्यांना का शोधून काढत नाहीत.' अशा थेट प्रश्न तिने ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला.रवीना टंडनचे ड्रग्स प्रकरणासंबंधीचे  हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीची नावे समोर आली आहेत. अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंग यांची देखील एनसीबी कडून चौकशी करण्यात आली.


मुंबई - अभिनेत्री श्रद्धा कपूर सारा अली खान दीपिका पादुकोण आणि रकुल प्रीत सिंह यांच्या अडचणी गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. सुशांत सिंह राजपूत मध्ये समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये काही अभिनेत्रींची नावे समोर आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो करत असलेल्या या चौकशीमध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

एनसीबीच्या सूत्रांकडून माहिती मिळते आहे की या चौकशी दरम्यान अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने छिछोरे सिनेमावेळी केलेल्या पार्टीबाबत माहिती दिली. एनसीबीच्या चौकशीमध्ये श्रद्धा कपूरने अशी माहिती दिली आहे की छिछोरेच्या पार्टीमध्ये ती पवना फार्म हाऊसवर गेली होती तेव्हा त्या पार्टीमध्ये तिने केवळ डान्स केला होता. तिने अशी माहिती दिली की तिने यावेळी ड्रग्ज घेतले नव्हते.

एनसीबीच्या प्रश्नांना उत्तरं देताना श्रद्धा कपूरने असे म्हटले की, ती छिछोरेच्या पार्टीमध्ये गेली होती. दुपारी जेवल्यानंतर ते आयलँडला पोहोचले होते. तिथे ड्रग्ज आणि दारुची पार्टी झाली. रात्री उशिरापर्यंत म्यूझिक लावून त्याठिकाणी पार्टी करण्यात आली होती. त्यावेळी अनेकांनी ड्रग्ज घेतले पण तिने ड्रग्ज घेतले नाहीत.श्रद्धा कपूरने एनसीबीसमोर असे मान्य केले आहे की तिने सुशांतला कधी व्हॅनिटीमध्ये तर कधी सेटवर देखील ड्रग्ज घेताना पाहिले आहे. NCB ने केलेल्या चौकशीत साराने आपण स्वतः ड्रग्ज घेत नाही, असे स्पष्ट केले पण सुशांतबरोबरच्या रिलेशनशिपबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. सारा अली खानने NCB च्या चौकशीत २०१८ मध्ये केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आपण सुशांतबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचे कबून केले आहे. एवढेच नाही तर या चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर सुशांतच्या केप्री हाऊस इथल्या घरात त्याच्याबरोबर राहायलाही सारा गेली होती.

NCB ने दीपिका पादुकोणची चौकशी सुरू केली तेव्हा दीपिका खूपच शांत आणि संयमी दिसत असल्याचे सूत्रांनी सांगितले. NCB ने ज्या whatsapp चॅटच्या आधारावर दीपिकाची चौकशी सुरू केली. ते चॅट्स आपलेच असल्याचे दीपिकाने कबूल केलं आहे. पण ड्रग्ज घेण्याबाबत नकार दिला.

मुंबई - राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागाने एक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, राज्यात आता कुठेही पान बिडी दुकानात अथवा राज्यात कुठेही सुटी सिगारेट व बिडी विकायला बंदी घालण्यात आली आहे.

आरोग्य विभागाने एक नवीन आदेश जारी केला आहे.राज्यात सुट्टी सिगारेट आणि बिडीच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी हा निर्णय घेण्यासाठी अनेक वेळा बैठका झाल्या होत्या. मात्र, यावर निर्णय होऊ शकला नव्हता. यासाठी  विधी व कायदा विभागासह सरकारकडे आरोग्य विभागाने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र, त्यावर कोणताही निर्णय विधी विभागाकडून देण्यात आला नव्हता.

‘सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा २००३’ ( जाहिरात, प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) नुसार सिगारेटच्या पाकिटाच्या ८५ टक्के भागावर सिगारेट वा बिडी आरोग्याला घातक असल्याचा संदेश असावे बंधनाकारक करण्यात आले होते. त्यामुळे सिगारेट हे आरोग्यास धोक्याचे असल्याचा संदेश दिला गेला. पण, आता अनेक पानटपऱ्यांवर सिगारेटच्या पाकिटातून एक-एक सिगारेटची आणि बिडीची विक्री केली जात आहे. याला आळा घालण्यासाठी सुट्टी सिगारेट आणि बिडी विक्रीवर बंदी आणावी असा प्रस्ताव आरोग्य विभागाने विधी व न्या विभागाकडे पाठवला. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.

विशेष म्हणजे, अनेक राज्यात असा नियम बंधनकारक करण्यात आला आहे. यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे सुद्धा राज्यात असा निर्णय व्हावा यासाठी आग्रही होते. त्यामुळे आता सर्व कायदेशीर बाजू तपासल्यानंतर राज्यात कोणत्याही पान-बिडी शॉप किंवा दुकानांवर यापुढे सुटी सिगारेट किंवा बिडी विकता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.


.

अहमदनगर - काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेल्या वादावर अखेर पडला आहे. अहमदनगर महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या सभापती पदासाठीच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. युगराज घाडे यांनी शिवसेनेतर्फे स्थायी समितीच्या सभापती पदासाठी अर्ज भरला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या तीन पक्षात चर्चा झाल्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे मनोज खोतकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. नगर जिल्ह्यात यापुढे महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र काम करण्याची सुरुवात स्थायी समितीच्या निवडणुकीपासून झाल्याची चर्चा आहे.याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला, असेही संग्राम जगताप यांनी म्हटले आहे. 


मुंबई -  मुंबईत येणाऱ्या सर्वच वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मुंबईतील पाचही प्रवेशद्वाराला असलेल्या टोलनाक्यावरील टोलदरात वाढ करण्यात आली आहे. टोलदरात ५ ते २५ रुपयांची वाढ  ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.मुंबईत लोकल सेवा सर्वसामान्यासाठी बंद आहे. तर एसटी-बेस्ट बसची संख्याही मर्यादीत आहे. अशावेळी अनेकजण मुंबईत येण्यासाठी व मुंबईबाहेर जाण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करतात. वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस रोड आणि दहिसर अशा पाच ठिकाणी मुंबईत प्रवेश करताना टोलनाके आहेत.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ५५ उड्डाणपूल बांधले आहेत. या पुलाचा खर्च वसूल करण्यासाठी पाच टोलनाक्याच्या माध्यमातून टोल वसुली केली जाते. तर करारानुसार दर तीन वर्षांनी टोलच्या दरात वाढ केली जाते. त्यानुसार १ ऑक्टोबरपासून पाचही टोलनाक्यावरील दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत येण्यासाठी जादा पैसे वाहनधारकांना द्यावे लागणार आहेत.नव्या दरवाढीनुसार५ ते २५ रुपयांनी टोलदरात वाढ करण्यात येणार आहे. लहान वाहनांसाठी एका फेरीकरता ३५ रुपयांऐवजी ४० रुपये द्यावे लागणार आहेत. तर मिनी बससाठी ५५ रुपयांऐवजी ६५ रुपये टोल असणार आहे. मिनीबससाठी टोलदरात १० रुपयांची वाढ झाली आहे. तर ट्रकसाठीच्या टोलमध्ये २५ रुपयांची वाढ झाली आहे. ट्रकसाठी १०५ रुपयांऐवजी १३० रुपये दर असणार आहे. अवजड वाहनांच्या टोल दरातही २५ रुपयांची वाढ झाली आहे. या वाहनांसाठी १३५ ऐवजी १६० रुपये दर लागू होणार आहे. वाहनांना टोलसाठी मासिक पास१ हजार ४०० रुपयांवरून १ हजार ५०० रुपये करण्यात आला आहे. 

नवी दिल्ली - आज बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे. निवडणूक आयोगानं १२.३० वाजता पत्रकार परिषद आयोजित केली असून, यात विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होणार आहे. सूत्रांच्या माहिती प्रमाणे मागील विधानसभा निवडणूक पाच टप्प्यात पार पडली होती. मात्र, यावेळी तीन टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्यापासूनच बिहारमधील राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. बिहारमध्ये करोना काळात निवडणूक होत असून, प्रचारापासून ते मतदानापर्यंत अनेक बाबींसाठी ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे.


मुंबई - अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज सेवनाचा मुद्दा समोर आला होता. या प्रकरणाचा तपास सध्या एनसीबीकडून (अमली पदार्थ नियंत्रक विभाग) केला जात आहे. या तपासात सुरूवातीला एनसीबीने काही जणांना अटक केली होती. त्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी केली असता तिच्या  तोंडून या प्रकरणात बॉलिवूडमधील इतर अभिनेत्रींची नावेही समोर आली असल्याने आज (२५ सप्टेंबर) एनसीबीने मुंबईत तीन ठिकाणी धाडी टाकल्या. 

ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. यात बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींची नावेही समोर आली असून  त्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यापैकी आज रकुल प्रीत सिंहची चौकशी केली जाणार आहे. त्यापूर्वीच एनसीबीने मुंबईतील तीन ठिकाणी ड्रग्ज प्रकरणात छापेमारी केली आहे.गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेल्या एनसीबीने शुक्रवारी सकाळी अचानक अंधेरी आणि पोवईत ही कारवाई केली आहे. कारवाईची विस्तृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. यापूर्वी एनसीबीने केलेल्या कारवाईत ड्रग्ज सापडले होते.

अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली. मात्र आपल्याला एनसीबीचे समन्स मिळाले नाहीत असे रकुलने माध्यमांना सांगितले होते. मात्र, एनसीबीने यावर भाष्य करत रकुलला समन्स मिळाल्याचे स्पष्ट केले. 


मुंबई - मुंबईत सध्या फक्त अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल चालवल्या जात आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांची मोठी संख्या तसेच कामाच्या वेळांमधील साम्य लक्षात घेता लोकलमध्ये मोठी गर्दी होताना दिसत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी आधी पश्चिम रेल्वेने पाऊल टाकले आणि आता तसाच निर्णय मध्य रेल्वेनेही घेतला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज साडेतीनशे विशेष लोकल चालवल्या जात होत्या. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अलीकडेच त्यात वाढ करण्यात आली. विशेष लोकलची संख्या दीडशेने वाढवून पाचशे पर्यंत नेण्यात आली. त्यावेळी मध्य रेल्वे कडूनही लोकलची संख्या वाढवण्यात यावी, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत होती. त्याचा विचार करून मध्य रेल्वेने तसा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर आजपासून अतिरिक्त ६८ लोकल चालवण्यात येत आहेत. या ६८ लोकलपैकी ४६ लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, खोपोली, कर्जत दरम्यान चालवण्यात येत आहेत तर अन्य २२ लोकल हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि गोरेगाव या दरम्यान चालवण्यात येतील, असे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मध्य रेल्वे मार्गावर आधी ३५५ विशेष लोकल दररोज धावत होत्या. ती संख्या आता ४२३ वर पोहचली आहे.


सोलापूर - सोलापुरातील. फरार मटका किंगला महिनाभरानंतर अटक झाली. हा मटका किंग भाजपचा नगरसेवक सुनील कामाटी आहे. त्याने तीन वर्षांत मटका व्यवसायातून ३०७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. याप्रकरणात २८८ जणांवर गुन्हे दाखल आहेत. ७० जणांना अटक करण्यात आली आहे. २४ ऑगस्टला पोलिसांनी धाड टाकली होती, पण त्यावेळी कामाटी फरार झाला होता. त्याला अखेर अटक करण्यात यश आले आहे. 

सोलापुरात महानगरपालिकेत सत्ता असलेल्या भाजपच्या एका नगरसेवकासह जवळपास २८८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर त्यापैकी ७० जणांना अटक देखील कऱण्यात आली आहे. या मटका प्रकरणातील फरार असलेला मुख्य आरोपी भाजप नगरसेवक सुनील कामाटी याला एका महिन्यानंतर हैदराबाद येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. २४ ऑगस्ट सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या टीमला सोलापुरातील कुंची कोरवे गल्ली येथील एका इमारतीत मटका व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार गुन्हे शाखेने इमारतीवर धाड टाकली. पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी पळून जाताना एकाचा यामध्ये मृत्यू झाला होता. या कारवाईत पोलिसांनी घटनेच्या दिवशी ४० जणांवर गुन्हा दाखल करत २८ जणांना ताब्यात घेतले होते.


नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आज शेतकऱ्यांकडून देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी अखिल भारतीय किसान सभा व संलग्न शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात ३० हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. याशिवाय, सीटू, हिंद मजदूर सभा, नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आदी १० कामगार संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. या संघटनाही बंदमध्ये सहभागी होतील.

कृषी विधेयके राज्यसभेत मंजुरीला आल्यापासून उत्तर भारतात शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या करून रास्ता रोखला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानेही केंद्राच्या धोरणांविरोधात काँग्रेसने पुढील दोन महिने जनआंदोलन करण्याचे ठरवले आहे. त्याअंतर्गत देशभर पत्रकार परिषदा घेऊन शेतकऱ्यांची बाजू मांडली जाईल. काँग्रेससह १५ विरोधी पक्षांनीही या शेती विधेयकांना विरोध केला असून राष्ट्रपतींना या विधेयकांवर स्वाक्षरी न करता ती परत पाठवण्याची विनंती केली आहे.

केंद्राने बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधणारी प्रक्रिया पुढे रेटली आहे. केंद्राची ही भूमिका शेती, माती व शेतकऱ्यांशी द्रोह करणारी आहे. केंद्र सरकारचे जमीन अधिग्रहण बिलात बदल करण्याचे प्रयत्न ज्याप्रकारे उधळण्यात आले त्या प्रकारे कृषी कायद्याचा अंमल करण्याचे सरकारचे प्रयत्न शेतकरीच उधळून लावतील, असे अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले. महाराष्ट्रातही हे आंदोलन तापण्यास सुरुवात झाली आहे. 

 

गांधीनगर - गुजरात एटीएसने केलेल्या मोठ्या कारवाईत चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. गांधीनगर येथून या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. एक हजार व पाचशेच्या या ११ हजार ९९ नोटा असून, त्यांचं एकूण मूल्य ९९.४ लाख म्हणजे जवळपास एक कोटी रुपये आहे.गुजरात एटीएसने कारवाईनंतर घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. आरोपी मनिष संघांनी (पटेल, वय ४२) हा मोरबी जिल्ह्यातील हळवद तालुक्यातील घनश्यामगढ येथील रहिवाशी आहे. आरोपी संघांनी याच्या कारमध्ये या नोटा सापडल्या आहेत. गांधीनगरमधील सेक्टर २८मध्ये एटीएसनं ही कार पकडली. त्यानंतर तपासणी केली असता, त्यात चलनातून बाद करण्यात आलेल्या एक हजार व पाचशेच्या जुन्या नोटा सापडल्या. 

यापूर्वी जुलै महिन्यात एटीएसने अशीच एक कारवाई केली होती. २९ जुलै रोजी करण्यात आलेल्या कारवाईत एटीएसने दोन जणांना अटक केली होती. तसेच त्यांच्याकडून ४ कोटी ७६ लाख रुपये मूल्य असलेल्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. गोंध्रातील पंचमहलमध्ये ही कारवाई करण्यात आली होती.

मुंबई - अमली पदार्थ प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे. कथित अमली पदार्थसंदर्भात व्हाट्सअ‌ॅप चॅट एनसीबीच्या हाती लागले आहेत. त्यासंदर्भात दीपिका आणि अन्य अभिनेत्रींची चौकशी केली जाणार असल्याचे कळते. . दीपिका व्यतिरिक्त श्रद्धा कपूर यांनाही एनसीबीने चौकशीसाठी बोलावले आहे. यात श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांनाही चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहेत.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित असलेल्या अमली पदार्थ प्रकरणाच्या चौकशी दरम्यान एनसीबीसमोर बॉलिवूडमधील 'ड्रग्ज नेक्सस' समोर आले आहे. एनसीबीने दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि एक टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीचे सीईओ ध्रुव चितगोपीकर यांची चौकशी करणार आहे. एनसीबीने समन्स बजावून दीपिकाला २५ सप्टेंबरला हजर राहण्याचे तर, श्रद्धा कपूर आणि सारा अली यांना २६ सप्टेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.सुशांतच्या मृत्यूप्रकरणातील तपासादरम्यान बॉलिवूड सेलिब्रिटींचे कथितपणे अमली पदार्थांसंदर्भात कनेक्शन समोर आले असून त्याची आता चौकशी सुरू आहे. सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया साहा हिची देखील एनसीबीने सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस चौकशी केली. या प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत १७ हून अधिक लोकांना अटक केली आहे. ज्यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांचा समावेश आहे.

सूरत - गुजरात येथे असणाऱ्या ONGC प्रकल्पात बुधवारी मध्यरात्र उलटून गेल्यानंतर सुमारे तीन वाजण्याच्या सुमरास गॅस प्लांटमध्ये भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. आगीचे स्वरुप पाहता सध्याही त्या ठिकाणी स्फोटांचे आवाज येत आहेत. त्यामुंळं नजीकच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनाही सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. गॅस पाईपलाईनच्या स्फोटामुळं ही आग लागल्याचा एएनआय या वृत्तसंस्थेने यासंबंधीचा एक व्हिडिओसुद्धा प्रसिद्ध केला आहे. जो पाहता आगीचे मूळ स्वरुप लक्षात येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु असून यात बऱ्याच अंशी यश मिळाल्याचे कळत आहे.ओएनजीसी गॅस प्रकल्पात झालेल्या स्फोटाचं स्वरुप अतिशय भीषण होते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार घटनास्थळानजीक असणाऱ्या गावांमधील घरांच्या खिडक्यांनाही यामुळे हादरा बसल्याचे जाणवले. दरम्यान, या दुर्घटनेमध्ये अद्याप कोणहीतीही जिवीत हानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. 
बीड - परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला दहा कोटी ७७ लाख रुपयांची थकहमी द्यावी, अशी आग्रही मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केल्यानंतर ती राज्य सरकारने मंजूर केली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील या कारखान्याला मदत करावी अशी भूमिका घेताना साखर कारखान्याच्या विषयात राजकारण आणणार नसल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.बीड जिल्ह्यातील भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी उभारलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची धुरा भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी पगारासाठी उपोषण केले. तसेच एफआरपी प्रमाणे पैसे मिळाले नसल्याने कारखाना आर्थिक अडचणीत आला असल्याचे समोर आले होते. महाविकास आघाडीने राज्यातील ३२ साखर कारखान्यांना थकहमी देण्याचा निर्णय घेतला असून त्यात वैद्यनाथ साखर कारखान्याला १० कोटी ७७ लाख रुपयांची थकहमी दिली आहे. पालकमंत्री व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ सहकारी कारखान्याला थकहमी मिळावी यासाठी आग्रही मागणी केली. राजकीय विरोध बाजूला ठेवून धनंजय मुंडे यांनी घेतलेली भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा आल्यानंतर पाच वर्षांतच कर्मचाऱ्यांवर थकीत पगारासाठी उपोषणाची वेळ आली हे दुर्दैव. आता तरी गळीत हंगाम सुरू करून परिसरातील उसाचे गाळप करावे आणि शेतकरी व कर्मचाऱ्यांचे हित जोपासून वैद्यनाथ सांभाळा असा टोलाही लगावला. 


नवी दिल्ली - अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ड्रगच्या पैलूने केल्या जात असलेल्या चौकशीतून ड्रगच्या कारभाराचे धागेदारे अमृतसर आणि पाकिस्तानमधील अमली पदार्थाचा कारभार करणाऱ्या टोळ्यांपर्यंत पोहोचले आहेत. ग्राहक ते ड्रग विक्रेते आणि पुरवठादारांसह ड्रगच्या कारभारात कोण आहेत, याचा शोध एनसीबी घेत आहे. बॉलीवूडमधील पूर्वीच्या आणि आजच्या प्रसिद्ध व्यक्तीही एनसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे.चौकशीशी संबंधित एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बॉलीवूडमधील ड्रगच्या कारभारात आणि मुंबईत ड्रगचा पुरवठा करणारे कोण आहेत, याचा अंदाज आला आहे. हेरॉईन, कोकेन आणि अन्य अमली पदार्थाचे ग्राहक आणि त्यांना अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांवर आरोप ठेवण्यासाठी ठोस पुरावे गोळा केले जात आहेत. ड्रगच्या कारभाराशी संबंधित अमृतसरमधील एका व्यक्तीला एनसीबी पाचारण करण्याची शक्यता आहे. मुंबईतील कोकेनचा पुरवठा करणाऱ्यांचा छडा लावण्यासाठी एनसीबीने अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या अमली पदार्थाविरोधी संस्थाचीही मदत मागितली आहे. सहयोगी संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१८ मध्ये भारतात १,२०० किलोग्रॅम कोकेन आले होते. यापैकी ३०० किलोग्रॅम कोकेन मुंबईत पोहोचले होते. जून २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियात ५५ किलो कोकेन जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीतून उपरोक्त माहिती उघड झाली.

ऑस्ट्रेलियाच्या माहितीच्या आधारे एनसीबीने गुन्हा दाखल केलेला आहे.कोलंबिया-ब्राझील आणि मोझाम्बिकमार्गे भारतात कोकेन आले. यासाठी आफ्रिका आणि दुबईतून काही ठिकाणांचा पयार्यी मार्ग म्हणून वापर करण्यात आला. भारतात मोठ्या प्रमाणावर पोटॅशियम परमँग्नेट उत्पादन केले जाते. त्याचा वापर कोकेन प्रकियेत केला जातो.

नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वीच ‘राफेल’ या फायटर विमानांचा इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात समावेश झाला. ‘गोल्डन अ‍ॅरो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राफेलच्या पहिल्या स्क्वार्डनमध्ये एका महिला फायटर पायलटचा समावेश करण्यात आला आहे. फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह असे या महिला फायटर पायलटचे नाव आहे.शिवांगी सिंह २०१७ साली इंडियन एअर फोर्सच्या सेवेत रुजू झाल्या. त्या दुसऱ्या बॅचमधील फायटर पायलट आहेत. वाराणासीच्या असलेल्या शिवांगी सिंह यांचे सध्या प्रशिक्षण सुरु आहे. त्या लवकरच अंबाला स्थित ‘गोल्डन अ‍ॅरो’ च्या १७ व्या स्क्वार्डनच्या भाग होतील.राफेल विमानांच्या वैमानिकांच्या चमूमध्ये हवाई दलातील महिला वैमानिकांची निवड करण्यात येणार असल्याचे वृत्त सोमवारी प्रसिद्ध झाले होते. राफेल एक मल्टीरोल म्हणजे बहुउद्देशीय फायटर विमान आहे.२०१७ मध्ये IAF मध्ये रुजू झाल्यापासून फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह या मिग-२१ बायसन विमानाच्या वैमानिक आहेत. राजस्थानातून त्या अंबालामध्ये दाखल झाल्या आहेत. राजस्थानामध्ये त्यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्यासोबत मिग-२१ बायसन विमान उडवले आहे. अभिनंदन वर्थमान यांनी २७ फेब्रुवारीला काश्मीरच्या आकाशात झालेल्या डॉगफाइटमध्ये पाकिस्तानचे एफ-१६ फायटर विमान पाडले होते.वाराणसीतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिवांगी सिंह यांनी बनारस हिंदू विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे त्या नॅशनल कॅडेट कॉर्पमध्ये ७ यूपी एअर स्क्वाड्रनचा भाग होत्या. त्यानंतर २०१६ साली ट्रेनिंगसाठी एअर फोर्स अ‍ॅकेडमीत प्रवेश घेतला. भारतीय हवाई दलातील दहा महिला वैमानिकांनी सुखोई, मिग २९ यासह सर्व प्रकारची लढाऊ जेट विमाने चालवली आहेत.

मुंबई - भाजपातील जेष्ठ नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. परंतु, त्यांना पक्षात प्रवेश देऊन कोणती जबाबदारी द्यायची? याचा निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात चर्चा करण्यात आली. त्यामुळे भाजपचा उत्तर महाराष्ट्रातील नेमका कोणता नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना नेतृत्वावर टीका करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यांच्या एका निर्णयामुळे राजकीय पटलावर मोठे वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील बड्या नेत्याला पक्षात प्रवेश देण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात बुधवारी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, अमळनेरचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील आणि गुलाबराव देवकर उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांचे म्हणणे ऐकून घेऊनच भाजपच्या या बड्या नेत्याला पक्षात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठीच पवारांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात चर्चा झाल्याची समजते. राष्ट्रवादीकडून प्रवेश करु इच्छिणा-या या नेत्याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजपचा हा बडा नेता कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. उत्तर महाराष्ट्र भाजपमध्ये दोन गट पडलेले आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र भाजपात सध्या असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे याबाबत कोणतेही जाहीर वक्तव्य केले नसले तरी भाजपमध्ये नाराज असणारे खडसे आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. जळगावमध्ये राष्ट्रवादीची कमी होणारी ताकद वाढवण्यासाठी खडसेंपुढे प्रस्ताव मांडणे हे राष्ट्रवादीच्या दृष्टीने फायद्याचे ठरू शकते, असे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला वाटत आहे.गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि खडसे यांच्यात खटके उडत आहेत. किंबहुना खुद्द खडसे यांनी कित्येकदा आपली नाराजी बोलूनही दाखवली आहे. इतकेच नव्हे, तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत नाराजीचा सूर आळवल्याचेही पाहायला मिळाले आहे. 


मुंबई - वडाळ्याच्या गणेश मंदिर मार्गावर पुन्हा उभारण्यात आलेले बेकायदा ‘साईधाम मित्रधाम मंडळ मंदिर’ जमीनदोस्त करण्याऐवजी त्याला पुढील आदेशापर्यंत टाळे ठोका, असे आदेश उच्च न्यायालयाने पालिकेला दिले. एकदा जमीनदोस्त केलेले हे मंदिर पुन्हा कोणी उभे केले हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे, त्यांची बाजू ऐकल्यावरच मंदिरावर कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले जातील, असे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.हे मंदिर २०१८ मध्ये जमीनदोस्त करण्यात आले होते. त्यानंतर परवानगीशिवाय काही स्थानिकांनी पुन्हा हे मंदिर बांधले. ही बाब माहीत असूनही पालिकेने कारवाई केली नाही, अशी याचिका करण्यात आली होती. त्यावर दुस-यांदा बांधण्यात आलेले हे बेकायदा मंदिर टाळेबंदीनंतर पुन्हा जमीनदोस्त करण्यात येईल. तोपर्यंत तेथे कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असे पालिकेने न्यायालयाला सांगितले होते. त्या दृष्टीने न्यायालयाने पालिकेला आदेश दिले होते. परंतु टाळेबंदीचे नियम शिथिल करण्यात आल्यावरही मंदिर जमीनदोस्त केलेले नाही. किंबहुना गणेशोत्सवात लोकांना तेथे प्रवेश दिल्याचा आरोप करत फ्लेचर पटेल यांनी पालिकेविरोधात अवमान याचिका केली आहे.मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर या अवमान याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी गणेशोत्सवात मंदिरात कोणाला प्रवेश दिला जाऊ नये किंबहुना टाळेबंदी उठेपर्यंत तेथे कोणालाही प्रवेश दिला जाऊ नये, असे पालिका आणि पोलिसांना बजावण्यात आले होते. त्यानंतरही १९ मेच्या आपल्या आदेशाचा पालिकेकडून अवमान झाल्याचे सकृद्दर्शनी स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच जमीनदोस्त केलेले हे मंदिर पुन्हा कोणी उभे केले हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. ते कोणी उभे केले हे पालिकेला माहीत नाही का? अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावर पालिकेने आदेशाचे उल्लंघन झाल्याचे मान्य करत दोन आठवड्यांत कारवाई करण्याचे आश्वासित केले. मात्र हे मंदिर पुन्हा कोणी उभे केले त्यांचे म्हणणे ऐकल्यावरच या प्रकरणी योग्य ते आदेश देऊ, असे स्पष्ट केले. 


nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget