मुंबईत कोरोना रुग्णात मोठी वाढ

मुंबई - मुंबईत नियंत्रणात आलेली कोरोनास्थिती पुन्हा एकदा बिघडू लागली आहे. गणेशोत्सवनंतर मुंबई शहरात दररोज दोन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. त्यातच बोरिवली, दहिसर,कांदिवली, ग्रॅन्ट रोड, गोरेगाव, अंधेरी-पश्चिम, मुलुंड या विभागांमधील रुग्णदुपटीचा कालावधी ५० दिवसांपेक्षाही कमी झाला आहे.
ऑगस्टमध्ये मुंबईमधील कोरोनाबाधितांच्या संख्येवर पालिके ने नियंत्रण मिळवले होते. वाढत चाललेला रुग्णदुपटीचा कालावधी हे त्याचे प्रमुख लक्षण होते. काही भागांत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी १०० दिवसांवर गेला होता. तसेच दररोज सरासरी ७५० रुग्णांची नोंद होत होती. मात्र गणेशोत्सवानिमित्त गावी जाण्याची लगबग, तसेच खरेदीसाठी उसळलेली गर्दी, पायदळी तुडविला गेलेला सामाजिक अंतराचा नियम आदींचे परिणाम आता मुंबईत दिसू लागले आहे. सध्या मुंबईत दोन हजारांच्या आसपास कोरोनाबाधित सापडत आहेत. दुसरीकडे पालिके ने कोरोना चाचण्या तब्बल १५ हजारांवर नेल्यानेही बाधितांची संख्या अधिक दिसते आहे. बाधितांना वेळीच विलगीकरणात हलवून संसर्गावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न पालिकेने सुरू आहेत. मात्र तरीही पालिकेला रुग्णदुपटीच्या काळावर नियंत्रण मिळविणे अवघड झाले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget