अन्यथा सरकारचे आदेश झुगारून मंदिरात प्रवेश करू, राज ठाकरेंचा सरकारला इशारा

मुंबई  -राज्य शासनाने नुकतीच अनलॉक ४ ची घोषणा केली. मात्र, अद्याप मंदिर उघडण्याबाबत सरकारकडून कोणताही निर्णय झाला नाही. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. सरकारने मंदिर उघण्यासाठी लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचलले नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, असा इशाराही राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.
सध्या महाविकास आघाडी सरकारचे काही बाबतीतील धोरण शिथिल करणे हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे, की ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरू असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाही? असा सवाल करत राज ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अनलॉक' प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरू आहेत. मॉल्स उघडले, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती १००टक्के करण्याची परवानगी दिली आणि या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरूच आहे. असं का? या सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे? असा सवालदेखील राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे.
गेले ५ महिने सगळं अर्थकारण ठप्प आहे. लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय पार बुडालेत. त्यामुळे आतातरी सरकारने निर्बंध शिथिल करून, सार्वजनिक वाहुतकीचं नीट नियोजन करून या अर्थकारणाला धुगधुगी द्यावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. या लोकांनी सरकारकडे विनंत्या, आर्जव केली, टाहो फोडला. पण सरकार स्वतःच्या धुंदीत तल्लीन झालंय. त्यामुळे 'देव तारी त्याला कोण मारी' या अंतिम श्रद्धेतून त्यांना त्यांच्या ईश्वराला साकडं घालायचं आहे. देवा या अस्मानी, सुलतानी संकटातून सोडव, असं आर्जव करायचं आहे आणि म्हणूनच सरकारने देव आणि त्याचे भक्त ह्यांची ताटातूट करण्याचा फंदात पडू नये, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget