काँग्रेसची ठाण्यात स्वबळाची तयारी

ठाणे - राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी सत्तेतील घटक पक्ष असलेला काँग्रेस ठाणे शहरात काहीसा नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच पुढील महापालिका निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी काँग्रेसकडून सुरू करण्यात आली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत तसा संदेश पदाधिकाऱ्यांना देऊन प्रभागातील लोकपयोगी कामे आणि नागरी समस्यांचा पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. मुंब्रा येथे झालेल्या या बैठकीमध्ये काँग्रेसचे सर्व नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते.

ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यानंतर या कार्यकारिणीची बैठक मुंब्रा येथे आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी ठाणे शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष मनोज शिंदे, अनिल साळवी, प्रदेश काँग्रेस सदस्य सुखदेव घोलप, जे. बी. यादव, अनिस कुरेशी, महिला काँग्रेस अध्यक्षा शिल्पा सोनोने, युवक काँग्रेस अध्यक्ष आशिष गिरी, एन.एस.यू. आय्. अध्यक्ष आकाश राहाटे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस पक्ष बूथस्तरापासून मजबूत करणे, हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून कार्यकारिणी कार्यरत राहील, असे चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. महापालिका निवडणुकीला अद्याप दोन वर्षे असली तरी नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ असल्याने त्यादृष्टीने कार्यकर्त्यांना दिशादर्शन करण्यात आहे. सरचिटणीस सचिन शिंदे, रवींद्र कोळी यांनी बैठकीचे नियोजन केले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget