मुंबई 'पीओके' असल्यासारखे वाटते - कंगणा रनौत

मुंबई - अभिनेत्री कंगणा रनौत हिने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाना साधला आहे. संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्यासाठी खुली धमकीच दिली असल्याचे कंगणाने म्हटले आहे. मुंबईत पीओकेसारखे वातावरण निर्माण होत असल्याची भावना येत आहे, असे कंगणाने ट्विट करून म्हटले आहे.कंगणाने बॉलिवूडमधील ड्रग्ज लाईनबाबत माहिती असल्याचे सांगितले होते. तिची अमली पदार्थ विरोधी पथकाची मदत करण्याची इच्छा आहे. मात्र, आपल्याला मुंबई पोलिसांची भीती वाटत आहे. हिमाचल प्रदेश पोलीस किंवा केंद्र सरकारकडून सुरक्षा मिळाल्यास आपण समोर येऊन माहिती देण्यास तयार आहोत, असे कंगणाने म्हटले आहे.त्यानंतर संजय राऊत यांनी 'सामना'मध्ये लिहिले होते की, मुंबईमध्ये राहत असूनही कंगणाचे मुंबई पोलिसांवर शंका घेणे निंदास्पद आहे. कंगणाने मुंबईत परत नाही आले तरी चालेल, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.सुशांतसिंह राजपूत प्रकरणात कंगणाने शिवसेनेवर निशाणा साधला होता. या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आल्यानंतर चौकशी करून सत्य समोर यावे, अशी मागणी कंगणाने केली होती. या प्रकरणाला ड्रग्जचे वळण मिळाल्यावर काल कंगणाने रणवीर सिंग, रणबीर कपूर, आयान मुखर्जी आणि विकी कौशल यांनी अँटी ड्रग्ज चाचणीला समोरे जायला हवे, असे ट्विट करून ते पीएमोला टॅग देखील केले होते. काल दिवसभर कंगणाने केलेल्या या आरोपांबाबत माध्यम आणि सोशल मीडियामध्ये एकच चर्चा सुरू झाली होती.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget