नवी मुंबईतच खारफुटी लावा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वनविभागाला सूचना

नवी मुंबई - मुंबई आणि नवी मुंबई जोडण्यासाठी दोन पूल उभारल्यानंतर आत्ता तिसऱ्या पुलाची उभाराणी सुरू करण्याच्या हालचाली आहेत. या पुलाच्या उभारणीसाठी १.४ हेक्टर जमिनीवरील खारफुटीची कत्तल होणार आहे. तोडल्या जाणाऱ्या या खारफुटीच्या बदल्यात तितक्याच जागेत बोरिवली येथे खारफुटीची लागवड केली जाणार आहे. मात्र या खारफुटीच्या लागवडीला नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. नवी मुंबईतील खारफुटीच्या बदल्यात केली जाणारी लागवड ही नवी मुंबईत करावी, अशी मागणी केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वनविभागाला तशा सूचना केल्या आहेत.नवी मुंबईला मुंबईशी जोडणाऱ्या खाडीवर तिसरा पूल उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या पुलाच्या उभारणीत वन खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या खारफुटींना मोठा धक्का बसणार आहे. या ठिकाणच्या १.४ हेक्टर जमिनीवरील खारफुटी नष्ट होणार आहेत. मात्र त्याऐवजी दुसऱ्या तितक्याच क्षेत्रफळाच्या जागेवर खारफुटीची लागवड करून पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र नवी मुंबईतील खारफुटी तोडून त्या बदल्यात बोरिवलीत खारफुटी लावण्याचे नियोजत होते. मात्र यामुळे नवी मुंबईचे होणारे पर्यावरणाचे नुकसान भरून निघणार नाही. त्यामुळे जर खारफुटीची लागवड करायचीच असेल तर नवी मुंबईतच लावली जावी, असे मत नेट कनेक्ट फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरण प्रेमी बी. एन. कुमार यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget