आदित्य ठाकरेंची ड्रग्स चाचणी केली पाहिजे - निलेश राणे

मुंबई - बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्यान ड्रग्सचा मुद्दा समोर आला होता. त्यानंतर अभिनेत्री कंगणा रणोत हिनं रणवीर आणि रणबीर सिंह यांना कोकेनचं व्यसन असल्याची अफवा पसरल्याचे सांगत ड्रग्स चाचणी करुन घ्यावी असे म्हटले होते. यावरून आता भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे यांचीदेखील ड्रग्स चाचणी करावी, असे राणे म्हणाले.फक्त रणवीर-रणबीर यांनी का? आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्ज चाचणी करावी, असे मला वाटते. कारण तेही बॉलिवूडच्या आतल्या गोटातील कलाकारांच्या जवळचे आहेत,असे निलेश राणे म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली. तसेच पोलिसांच्या मुद्द्यावरूनही त्यांनी कंगणावर निशाणा साधला. पोलिसांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही असेही ते म्हणाले.दोन तीन अधिकारी प्रेशर मध्ये आले म्हणजे संपूर्ण पोलीस खाते दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्याइतकी राणावत कोण लागून गेली? सुशांत सिंह आणि सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत. पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही,असेही राणे म्हणाले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget