मराठा आंदोलकांना आंदोलन न करण्याचे मुख्यमंत्रांचे आवाहन

मी घरीच बसून काम करतोय, असा आरोप होतोय. पण मी व्हिडिओच्या माध्यमातून खेड्यापाड्यात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलो. महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जात आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली.महाराष्ट्रात कोरोनाची लाट, निसर्ग चक्रीवादळ आले. पण, याही परिस्थितीत सरकार खंबीर आहे तुमच्या पाठीशी आहे. पुनश्च हरीओम अर्थात मिशन बिगिन अगेनला पुन्हा सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्यासाठी त्यांनी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिम राबवण्याबाबत सांगितले. 
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले आहे यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात राज्य सरकारने पूर्ण ताकदीने बाजू मांडली आहे. पण मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावर मराठा समाजाला आवाहन करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकार मराठा आरक्षणासोबत असून आंदोलन करू नका, अफवांना बळी पडू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.स्थगिती गरजेची नव्हती, ती देण्यात आली आहे हे अनाकलनिय आहे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.
ज्या मराठा संघटना आहे, जी लोक आहे त्यांच्याशी बोलत आहे. अशोक चव्हाण आणि इतर नेत्यांशी बोलणे सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे झाले आहे. मराठा आरक्षणासाठी आम्ही सरकारसोबत आहोत अशी ग्वाही फडणवीसांनी दिली' अशी माहिती यावेळी उद्धव ठाकरेंनी दिली.

मराठा आरक्षणाची तुमची जी भावना आहे, तीच आमचीही भावना आहे. तुमच्या मागण्या या राज्य सरकारच्या मागण्या आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार कोर्टात लढा देत आहे. मराठा समाजाच्या सर्व सुचनांचा विचार करून रणनीती आखत आहे. सरकार मराठा समाजासोबत आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीत आंदोलन काढू नका, तुम्हाला न्याय मिळवून देणे यासाठी सरकार कटीबद्ध आहे. मराठा समाजाने अफवांना बळी पडू नये, कुणाच्या बोलण्यात येऊ नये. गैरसमज पसरवू नका, असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी केले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget